Uttarakhand Election 2022 : आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. काही नेते पक्षही बदलत आहेत. आता अभिनेत्री रिमी सेन हिने भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे.







रिमी सेन सध्या चित्रपटांपासून दूर असून ती राजकारणात सक्रिय झाली आहे. रिमी सेनने 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. उत्तराखंडमध्ये ती भाजपची स्टार प्रचारकही होती. मात्र आता तिने भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.


 


रिमी सेन ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये गोलमाल, हंगामा, दिवाने हुए पागल, धूम 2, फिर हेरा फेरी यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.  याशिवाय रिमी सेन बिग बॉस 9 ची स्पर्धकही राहिली आहे. परंतु, रिमी गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळापासून बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर असून सध्या ती राजकारणात नशीब आजमावत आहे.


उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या 70 जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निकालानंतरच उत्तराखंडमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता येणार हे ठरणार आहे. उत्तराखंडसारख्या डोंगरी राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत.  


उत्तराखंडमध्ये सध्या भाजपचे सरकार असून तेथील भाजपाच्या निवडणूक प्रचार अभियानाला एक फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. प्रचारासाठी राज्यात केद्रीय मंत्री आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत.  


 उत्तराखंडमध्ये कोणाचे सरकार येणार?
उत्तराखंडमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार येणार यावरून बरेच तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या राज्यात आजपर्यंज भाजप आणि काँग्रेस सत्तेत राहिले आहेत. तर बीएसपी या पक्षाची उत्तराखंडमध्ये महत्वाची भूमिका राहिली आहे. उत्तराखंच्या निर्मितीनंतर पहिल्या तीन विधानसभेत बीएसपी हा तिसरा मोठा पक्ष ठरला  होता. परंतु, 2017 च्या निडणुकीत या  पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. उत्तराखंडच्या हरिद्वार आणि नैनीतालमध्ये अनेक जागांचा निकाल हा शेतकऱ्यांच्या  मतांवर ठरतो.  या भागांत शेतकऱ्यांची संख्या  जास्त आहे. 


महत्वाच्या बातम्या