एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : संघाच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या सेनेचं रामरक्षा आंदोलन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नागपूरमधून सुरुवात, राज्यभर आवाज उठवणार

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुढील आठवडण्यात नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन केलं जालं जाणार आहे. त्यानंतर विदर्भात राम रक्षा आंदोलन केलं जाईल.

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांची बैठक संपन्न झाली. आमदारांच्या बैठकीत अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान चोरी प्रकरण, राज्यभरातील रामरक्षा आंदोलनाचं आयोजन, संघटना बांधणी, एसआयआर मोहीम आणि विधिमंडळ अधिवेशन यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर निर्माणाच्या आंदोलनाची  ठिणगी मातोश्रीतून पडली आता राम मंदिर चोरीच्या जनसामान्यांच्या आक्रोशाची ठिणगी सुद्धा मातोश्री वरूनच पडणार असल्याचं म्हटलं. राज्यात जिल्ह्याजिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राम मंदिरमधील चोरीच्या विरोधात रामरक्षा आंदोलन करण्यात यावे,अशी सूचना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केली. नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा आंदोलन करण्यात येणार असून स्वत: उद्धव ठाकरे या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

उद्धव ठाकरेंचं नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन  

अधिवेशन संपल्यानंतर पुढील आठवड्यात नागपूरमध्ये संघाच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राम रक्षा आंदोलन करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये राम रक्षा आंदोलन केले जाणार आहे.  त्यानंतर संपूर्ण विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार आहे.

काँग्रेस आप सपा हे पक्ष सुद्धा राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी आवाज उठवत आहेत. आपण देखील राज्यभरात आंदोलन केलं पाहिजे, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आमदारांना केल्या आहेत.  राज्यभरात आंदोलन कसं करता येईल याबाबत आमदार म्हणून तुम्ही जातीन लक्ष घाला असं उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितलं. 

उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसंदर्भात महत्त्वाच्या सूचा केल्या. ज्या ठिकाणी बंडखोर आणि त्यांच्यासोबत जे पदाधिकारी गेले ती रिक्त पद लवकर भरून काढा आणि नव्या नियुक्त करा, असंही ते म्हणाले. एसआयआर वर विशेष लक्ष केंद्रित करा, एसआयआर मोहीम राबवली जात असताना ठीक ठिकाणी आपले मतदार वगळले जात नाहीत ना याची खबरदारी घ्या असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. अधिवेशनाचे शेवटचे तीन दिवस राहिले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातले आणि मुंबईचे प्रश्न मांडा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

बैठकीला कोणकोणते आमदार उपस्थित?

1) नितीन देशमुख
2) सुनील राऊत 
3) भास्कर जाधव 
4) बाळा नर
5) अंबादास दानवे 
6) ज. मो. अभ्यंकर
7) मनोज जामसुतकर
8) अनिल परब
9) हारून खान
10) महेश सावंत
11) संजय देरकर 
12) अजय चौधरी
13) वरुण सरदेसाई 
14) दिलीप सोपल 
15) सिद्धार्थ खरात
16) सुनील शिंदे
17) बाबाजी काळे
18) गजानन लवटे
19) कैलास पाटील
20) प्रवीण स्वामी
21) सुनील प्रभू

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Police Dogs: आता पोलीस डॉग निवृत्त झाला तरी पोलिसांसोबतच राहणार; CM देवेंद्र फडणवीसांचा संवेदनशील निर्णय
आता पोलीस डॉग निवृत्त झाला तरी पोलिसांसोबतच राहणार; CM देवेंद्र फडणवीसांचा संवेदनशील निर्णय
Samadhan Sarvankar On Shivsena UBT Vishakha Raut: व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
Mahendra Dalvi: 'राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष, आम्ही त्यांना गणतीत पकडत नाही'; महेंद्र दळवींचा घणाघात
'राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष, आम्ही त्यांना गणतीत पकडत नाही'; महेंद्र दळवींचा घणाघात
Advertisement

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget