एक्स्प्लोर

Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल

महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे ह्यांची जाहीर सभा खांडके बिल्डिंग, दादरला पार पडली. या सभेत बोलताना राज यांचा भाडोत्री असा उल्लेख केला.

Uddhav Thackeray On Raj Thackeray : वापरा आणि फेकून द्या, भाजपचे हे नवे धोरण आहे. नकली सेना, नकली पुत्र म्हणत आहेत. काही दिवसांनी मोदी नकली आरएसएसही म्हणतील. आज एका वृत्तपत्रात बातमी ही आली आहे, आता भाजपला आरएसएसची गरज नाही. याचा अर्थ आता संघाला धोका आहे. सोळावं वरीस धोक्याचं तसं संघाला शंभर वरीस धोक्याचं होणार असल्याची खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. 

महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे ह्यांची जाहीर सभा खांडके बिल्डिंग, दादरला पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांचा भाडोत्री असा उल्लेख केला. मोदी आणि शाह यांना निवांत झोप लागो या शुभेच्छा देतो. त्यांना आपण इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला बोलावणार आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला. 

ठाकरे नावाचा माणूस भाडोत्री घेतला 

उद्धव ठाकरे म्हणाले की, अनिल देसाईंचे राज्यसभेतील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आणि समोरच्या उमेदवाराचेही व्हिडीओ तुमच्याकडे आले असतील. मग सांगा तुम्हाला रेवण्णासारखा पाहिजे की अनिल देसाई सारखा पाहिजे? गद्दार, चारित्र्यहिन, भ्रष्टाचारी जमवून तरी त्यांना काही पुरत नाही, त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्याने तिकडे एक ठाकरे नावाचा हवा म्हणून एक भाड्याने घेतला आहे. दुपारी उठून सुपारी चघळत बसले असतील.  

मी भाजपला लाथ घातली आहे, हिंदुत्व कसे सोडेन

ते पुढे म्हणाले की, हल्ली मी काहीही बोललो तरी अर्थाचा अनर्थ केला जातो. मी माझ्या भाषणाची सुरुवात कशी करतो, यावरून देवेंद्र फडणवीस काल बोलले. अहो, मी भाजपला लाथ घातली आहे, हिंदुत्व कसे सोडेन? माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मी देशभक्त आहे, मी अंधभक्त नाही. त्यांनी पुढे म्हणाले की, मोदी मुंबईला भिकारी करू पाहत आहेत. घाटकोपरमध्ये रोड शो झाला, तो हिणकस होता. आशिया खंडातील महाकाय होर्डिंग कोसळला. त्यात नेमके किती मृत्यू झाले, हा खरा आकडा समोर नाही. त्याच्याच बाजूला फुलांची उधळण करून, मोदींचा रोड शो काढण्यात आला. कशासाठी? सांत्वन करायला केलं का हे? या रॅलीसाठी मुंबई पालिकेने खर्च केला, असा आरोपही त्यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
Embed widget