Uddhav Thackeray: 'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
Uddhav Thackeray: धनुष्यबाण आणि मशाल यात गद्दार पुन्हा धनुष्यबाण आपल्यासमोर घेऊन येईल. धनुष्यबाणाचा निकाल तोपर्यंत लागेल अशी अपेक्षा करणे बरोबर आहे की नाही याची कल्पना नाही.
Uddhav Thackeray: विधानसभा निवडणूकीआधी कोर्टाचा निकाल लागेल की नाही माहीत नाही असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या भेटीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोरदार गरजले आहेत. आज मी मशाल पेटवायला आलोय असं म्हणत प्रत्येकाच्या घरात मशाल पेटायला हवी असं वचन हवं आहे. आपल्या धनुष्यबाणाचा निकाल लागेल की नाही हे माहित नाही. काल परवा पंतप्रधानच सरन्यायाधिशांच्या घरी जाऊन आले. नशीब मोदी घरी येणार म्हणत त्यांनी गणपतीला पुढची तारिख नाही दिली अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये ते बोलत होते.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
धनुष्यबाण आणि मशाल यात गद्दार पुन्हा धनुष्यबाण आपल्यासमोर घेऊन येईल. धनुष्यबाणाचा निकाल तोपर्यंत लागेल अशी अपेक्षा करणे बरोबर आहे की नाही याची कल्पना नाही. काल-परवा मध्ये पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन आले. अख्या देशात आहे त्याची निंदा झाली. पण मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतो. कारण एवढ्यासाठी मोदी घरी येणार म्हणत त्यांनी गणपतीला पुढची तारीख नाही दिली, अशी टीका जाहीरपणे उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या भेटीवर केली.
न्यायालयापेक्षाही वरचं जनतेचा सर्वोच्च न्यायालय आमच्यासमोर...
आमच्याकडे गणपती आहेत. पंतप्रधान मोदी येणार आहेत. गणपती बाप्पा तुझा नंतर ये.. ही काय थट्टा चालवली असा सवाल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. दोन वर्षांपासून आम्ही तुमच्याकडे दाद मागत आहोत. देशाची लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही हे मागतो आहोत. न्यायदेवतेवर विश्वास जरूर आहे. पण न्यायालयानेच दाद दिली नाही तर त्याहीपेक्षा वरचं जनतेचा सर्वोच्च न्यायालय आमच्यासमोर आहे. या जनतेच्या दरबारात मी आता आलो आहे हा न्याय मला तुमच्याकडून पाहिजे,असेही ठाकरे म्हणाले.
आपली सत्ता आल्यावर जुनी पेन्शनची मागणी मान्य करू
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठकरे यांनी आगामी विधानसभा निवडणणूकांसाठी छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये रणशिंग फुंकले असून सत्ता दोन महिन्यांनी निवडणुका आहेत. आपलं सरकार आलं तर जुन्या पेन्शनची योजनेची मागणी मान्य करतो असं म्हणत महायुतीवर जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.