(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray on Narendra Modi and Ashok Chavan : अशोक चव्हाणांना लोकांनी गावातून हाकलून दिलंय, मोदींना गुजरातला परत पाठवणार, उद्धव ठाकरेंचा कडाडून हल्लाबोल
Uddhav Thackeray on Narendra Modi and Ashok Chavan : तुमच्या बाजूने आज संपूर्ण देशात रान पेटलं आहे. ते रान तुम्हाला विझवता येत नाहीये. अनेक गावांमध्ये तुमच्या चेल्याचपाट्यांना गावबंदी झालेले आहे. अ
Uddhav Thackeray on Narendra Modi and Ashok Chavan : "तुमच्या बाजूने आज संपूर्ण देशात रान पेटलं आहे. ते रान तुम्हाला विझवता येत नाहीये. अनेक गावांमध्ये तुमच्या चेल्याचपाट्यांना गावबंदी झालेले आहे. अगदी अशोक चव्हाणांना पाहा त्यांच्या सभेमध्ये लोकांनी गोंधळ घातलाय. आता अशोक चव्हाणांना वाटत असेल की, अरे मी काँग्रेसमध्ये होतो ते बरा होतो. निदान लोक विचारपूस तरी करायची. आता घामचं पुसावा लागतोय. गावातून पण त्यांना हाकलून दिलंय", अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर केली. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी वडाळा अँटॉप हिल येथे सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला.
यांची वाईट अवस्था झालेली आहे
उद्धव ठाकरे म्हणाले, यांची एवढी वाईट अवस्था झालेली आहे. हे मोदीजी आता येत आहेत. 2014 मध्ये सांगितलं होतं, या गोष्टी तुमच्या हातात असतील. 19 मध्ये सांगितलं होतं आणखी या गोष्टी असतील. आता 5-10 वर्षांचा हिशोबच नाही. आता म्हणत आहेत, 2047 मध्ये बघा तुमच्या हातामध्ये हे असणार आहे. 2047 साल कोण बघणार आहे. तुम्ही 47 सांगताय तर मी 2050 साली काय देतो ते बघा, असं सांगतो. काय वाटेल ते बोलतात. सर्वांना मी घर देणार , 140 कोटी लोकांना फुकट धान्य देणार , मी इथून चंद्रावरती रस्ता बांधणार तुम्हाला तरी यांची आश्वासने पटतात का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
घाम गाळून कष्ट करुन ही मुंबई मिळवली आहे
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, दोन वेळेस आपण फसलो. अच्छे दिन आयेंग, 15 लाख रुपये देणार या सगळ्या थापा मारतात. ही मुंबई अशीच नाही मिळाली. 107 हुतात्मे झालेत. त्यावेळी पत्रकार महिला ताया झिंकिन मुंबईत आल्या होत्या. त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. रिपोर्टिंग इंडिया नावाचे ते पुस्तकं आहे. त्या पुस्तकात त्यांनी नमूद केलं आहे की, त्यावेळी जो गोळीबार झाला होता. यात जे लोक जखमी झाले त्यांना पाहायला त्या रुग्णालयात गेल्या होत्या. त्यावेळी 200 ते 250 मृतदेह त्यांच्यासमोर पडले होते. एवढं रक्त सांडून आम्ही मुंबई मिळवली आहे. घाम गाळून कष्ट करुन ही मुंबई मिळवली आहे.
आता आम्हीच तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही
मुंबई देशातील सर्वांत जास्त कर भरणारी नगरी आहे. आर्थिक राजधानी आहे. हे त्या मोदी -शाहांच्या पोटात दुखतय. मुंबई कशी असू शकते. अहमदाबाद असायला पाहिजे. जे उद्योग आपल्याला महसूल आणि कर देत होते, ते सर्व ऑफिस गुजरातला नेले. सिमेंटच्या कंपन्यांचे ऑफिसही यांनी गुजरातला नेले. गुजरातबद्दल असुया किंवा द्वेष नाही. उद्या इंडिया आघाडीचे सरकार आले तरी गुजरातच्या हक्काचे जे काही असेल ते नक्की देऊ. गुजरातवर अन्याय करणार नाही. पण मोदी महाराष्ट्राच्या तोंडातील घास काढून गुजरातला भरवत आहात. तो घास आम्ही तुम्हाला काढू देणार नाही. आता आम्हीच तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आमच्याकडून सगळं गुजरातला नेत आहात, तर तुम्ही पण गुजरातला जा, अशी टीकाही ठाकरेंनी यावेळी केली.
ABP Majha LIVE | Sharad Pawar | Sunetra Pawar | Mahayuti vs MVA | PM Narendra Modi Parbhani