एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : राष्ट्रवादी-ठाकरे गटाचं ठरलं, 'वंचित'चं काय? उद्धव ठाकरे म्हणाले..

Uddhav Thackeray : "वंचित बहुजन आघाडीशी आमची बोलणी सुरु आहे. दोन दिवसांमध्ये संजय राऊत यांच्यासमवेत शिवसेनेचे 2 नेते आणि वंचितचे नेते एकत्र बैठक घेतील. याशिवाय, शिवसेना, राष्ट्रवादी वंचित अशा महाविकास आघाडीतील पक्षांशी एकत्रित बैठक घेतली जाईल.

मुंबई : "वंचित बहुजन आघाडीशी आमची बोलणी सुरु आहे. दोन दिवसांमध्ये संजय राऊत यांच्यासमवेत शिवसेनेचे 2 नेते आणि वंचितचे नेते एकत्र बैठक घेतील. याशिवाय, शिवसेना, राष्ट्रवादी वंचित अशा महाविकास आघाडीतील पक्षांशी एकत्रित बैठक घेतली जाईल. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि मी प्रत्यक्ष भेटल्यानंतर जागावाटपाबाबत चर्चा करु. 12-12 जागांचा कोणताही फॉर्म्युला अद्याप माझ्यासमोर आलेला नाही," असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. अजित पवार यांचे विश्वासू सहकारी संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते बोलत होते. ठाकरे यांनी लोकसभेसाठी जागावाटप, राममंदिर, मुंबईतील प्रश्नांवर यावेळी भाष्य केले. 

ठाकरे म्हणाले, आम्ही जागावाटपाबाबत लवकरच निर्णय घेणार आहोत. काँग्रेसकडूनही अद्याप कोणताही फॉर्म्युला आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जागावाटपाचा प्रश्न सुटलाय. देश वाचवायचा, लोकशाही वाचवायची आहे. यासाठी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. मुंबईत भ्रष्टाचाराची फार घाण झालेली आहे, ती साफ करायची आहे, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. 

राम मंदिरासाठी शिवसेनचे मोठे योगदान - ठाकरे (Uddhav Thackeray) 

राम मंदिराच्या लोकार्पणासाठी मला निमंत्रण आलेलं नाही. अयोध्येत राम मंदिर होतय ही आनंदाची गोष्ट आहे. शिवसेनेचं राम मंदिरासाठी मोठ योगदान आहे. शिवसेनाचा मोठा संघर्ष आहे. शिवसेना  प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार राम मंदिरासाठी लढा दिल्यामुळे हेरावून घेण्यात आला होता. शिवसेनेने राममंदिरासाठी पक्षनिधीतून योगदान दिले होते. मी यापूर्वी दोनदा अयोध्येत गेलोय, असे उद्धव ठाकरे स्पष्ट केले. राम मंदिराचा पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये, अशी माझी इच्छा होती. देवेंद्र फडणवीस बाबरी मशीदीच्या घुमटावर चढले असतील आणि त्यांच्या वजनामुळे बाबरी पडली, असेल असा उपासाहत्मक टोलाही ठाकरे यांनी लगावला. 

जिथे सत्ता असते तिथे, गर्दीचा ओघ असतो, पण इथे वेगळंय : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 

"आज तुम्ही सर्वांनी पक्षप्रवेश केला. इथे सत्ता नसताना सत्ता आणण्याच्या जिद्दीनं तुम्ही इथे आलात. काही आपली खुर्ची टिकवण्याच्या लाचारीनं जे गेलेले आहेत, हाच स्वाभिमान आणि लाचारीतला फरक आहे. जिथे सत्ता असते तिथे, गर्दीचा ओघ असतो. पण इथे वेगळं आहे. मला तुमचा उत्साह सांगतोय की, तिथे प्रचाराला येण्याची गरज नाही, आजच तिथे मावळमध्ये भगवा फडकला आहे. हा मावळ मतदारसंघ वेगळा आहे. तरी मी प्रचाराला तर येईलच.", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Sanjog Waghere: संजोग वाघेरेंचा ठाकरे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंनी मावळचं रणशिंग फुंकलं, श्रीरंग बारणेंविरोधात उमेदवारी जवळपास निश्चित

 

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget