एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Uddhav Thackeray Hambarada Morcha: संपूर्ण कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात आज छ.संभाजीनगरमध्ये 'हंबरडा' मोर्चा; मुख्यमंत्र्यासह महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार प्रहार

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या मोर्चावरून मुख्यमंत्र्यासह महायुतीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.

Uddhav Thackeray Hambarada Morcha : राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज (11 ऑक्टोबर) रस्त्यावर उतरणार आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा कढण्यात येणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या 'हंबरडा' मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. शहरातील क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी ठाम मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं लावून धरली आहे. तसंच पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याची मागणीदेखील उद्धव ठाकरेंनी केलीय. त्यामुळे आजच्या मोर्चातून उद्धव ठाकरे सरकारवर काय निशाणा साधणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: 'उद्धव ठाकरेंनी आधी आरशामध्ये पाहावं आणि त्यानंतर मोर्चे काढावेत'

दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या या मोर्चावरून महायुतीच्या नेत्यांस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. 'उद्धव ठाकरेंनी आधी आरशामध्ये पाहावं आणि त्यानंतर मोर्चे काढावेत', असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला आहे. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 16 लाख शेतकऱ्यांचे पैसे दिले, तर ठाकरे सरकारने अडीच वर्षांत कवडीही दिली नाही, असा आरोपही फडणवीसांनी केला. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेंवर हल्लाबोल करत, विरोधी पक्षाला वाटलं नव्हतं की आमचं सरकार एवढं मोठं पॅकेज देईल, असं म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना, हे संकट मोठं आहे आणि या संकटात आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभे आहोत, असंही शिंदे म्हणाले.

Sanjay Kenekar on Hambarada Morcha : पक्ष जिवंत ठेवण्याचा धांगडधिंगा म्हणजे आजचा मोर्चा

तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून महायुतीच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरेंच्या आजच्या मोर्चावरून सडकून टीका केलीय. उद्धव ठाकरे आणि शेतीचा काही संबंध आहे का? भुईमुगाच्या शेंगा खाली येतात की वर येतात, हे आधी त्यांनी सांगावं, असा तिखट प्रश्न भाजप आमदार संजय केनेकर यांनी उपस्थित केलाय. उद्धव ठाकरेचा मोर्चा म्हणजे नाचता येईना अंगण वाकड. त्यांनी बांधावर खतं देऊ, बियाणे देऊ असं म्हटलं ते कुठे गेलं. पक्ष जिवंत ठेवण्याचा धांगडधिंगा म्हणजे आजचा मोर्चा, अशी टीकाहि त्यांनी यावेळी केली.

Sanjay Shirsat on Hambarada Morcha : यांना राजकारण व्यतिरिक्त काही दिसत नाही

उद्धव ठाकरे यांना टोमणे मारायची सवय आहे. कसला हंबरडा. शेतकरी रडतोय, आत्महत्या करतोय, शेती उध्वस्त झाली आहे आणि त्याच्या नावाने हंबरडा मोर्चा काढतात. त्यांना मदत करा, शक्य होईल तेवढी मदत करा. मोर्चा काढून राजकारण करण्यापेक्षा सहकार्य करा. असा सल्ला देत मंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या मोर्चावर टीका केली आहे. यांना राजकारण व्यतिरिक्त काही दिसत नाही. यावेळी विरोधी पक्ष आणि सरकार यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे. एकनाथ शिंदे आणि सरकारला शिव्या देणे एवढेच काम त्यांच्याकडे आहे. यांचा मोर्चा नाही यां राजकारण आहे. ही वेळ मोर्च्याची नाही, शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आहे. आजचा मोर्चा म्हणजे नौटंकी. हे इनकमिंग वाले आहेत. आउटगोइंग वाले नाहीत. हे लेना बँक वाले आहेत. असेही मंत्री संजय शिरसा म्हणाले.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election: नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
Bihar Vidhansabha Result बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
Sangamner Election 2025: संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
Bihar Election Result 2025 बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार
बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal on Bihar Election :बिहारमध्ये काँग्रेसचं काय चुकलं? हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
Vijay Wadettiwar On Bihar Result :त्यांचा विजय होणारच होता,बिहार निकालावर वडेट्टीवार असं का म्हणाले?
Harshwardhan Sapkal on Bihar Election : महाविकास आघाडीत कोणतंही भांडणं नाही, सपकाळ स्पष्टच म्हणाले..
BJP Celebration : एनडीएला बिहारमध्ये घवघवीत यश,  भाजपकडून जल्लोष साजरा
Sudhir Mungantiwar On Bihar Result : 2014 पासून बिहारच्या विकासाला गती मिळाली - मुनगंटीवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election: नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
Bihar Vidhansabha Result बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
Sangamner Election 2025: संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
Bihar Election Result 2025 बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार
बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार
Pune Crime News: आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली;  नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली; नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
Bypoll Election Results 2025: बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
Crime News: बेडरूममध्ये पती लटकलेल्या अवस्थेत, पत्नी अन् 3 मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले, एकाच घरातील 5 मृत्यू मागील गूढ काय?
बेडरूममध्ये पती लटकलेल्या अवस्थेत, पत्नी अन् 3 मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले, एकाच घरातील 5 मृत्यू मागील गूढ काय?
Bihar Election Result 2025: जेडीयू, भाजपची बिहारमध्ये गाडी सुसाट, पण थेट नितीशकुमारांना नडून बसलेल्या मोदींच्या हनुमानाचं काय झालं?
जेडीयू, भाजपची बिहारमध्ये गाडी सुसाट, पण थेट नितीशकुमारांना नडून बसलेल्या मोदींच्या हनुमानाचं काय झालं?
Embed widget