एक्स्प्लोर

Vijay Shivtare: मी व्हेंटिलेटरवर असताना उद्धव ठाकरेंनी ढुंकूनही बघितलं नाही, शिंदे-फडणवीस लोकांना जपतात: विजय शिवतारे

Maharashtra Politics: विजय शिवतारे यांनी 'एबीपी माझा'च्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी शिवतारे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचे कौतुक.

मुंबई: 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्याच्या महिनाभरानंतरच माझ्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली, माझी ओपन हार्ट सर्जरी झाली होती. पण त्यावेळी शिवसेनेतील एकाही नेत्याने माझ्याकडे ढुंकून पाहिले नव्हते, पक्षप्रमुखांचा साधा फोनही आला नव्हता, अशी खंत पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी व्यक्त केली. ते मंगळवारी एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विजय शिवतारे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वशैलीविषयीची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली.

यावेळी विजय शिवतारे यांनी त्यांच्या आजारपणातील एक प्रसंग सांगितला. आजघडीला राजकारणात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे ठराविक लोक सोडले तर इतर नेते आपले कार्यकर्ते, आमदार किंवा मंत्र्यांची काळजी घेत नाहीत. मी विधानसभा निवडणुकीत पडल्यानंतर एक महिन्यातच माझी सर्जरी झाली होती. माझं मोठं ऑपरेशन झालं. पण त्यावेळी माझ्या पक्षातील (शिवसेना) कोणीही माझ्याकडे ढुंकून पाहिलं नाही. त्यावेळी चारवेळा मला भेटायला कोण आले तर एकनाथ शिंदे आले. सतत बोलायला आणि बारकाईने लक्ष द्यायला कोण होते, तर ते देवेंद्र फडणवीस होते, असे विजय शिवतारे यांनी सांगितले.

 पण मी ज्या पक्षात (शिवसेना) होतो, त्या पक्षाच्या प्रमुखांचा साधा फोनही आला नाही. उद्धव ठाकरेच काय शिवसेनेतील एकाही नेत्याने माझ्याकडे लक्ष दिले नाही. मी ज्या रुग्णालयात होतो तेव्हा तिकडे अनिल देसाई आले होते. मी आयसीयूमध्ये असताना अनिल देसाईंचा आवाज ओळखला. पण अनिल देसाई हे रुग्णालयात दुसरं कोणालातरी भेटायला आले होते. मी आयसीयूमध्ये 7 दिवस व्हेंटिलेटरवर असताना शिवसेनेचा एकही नेता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. राजकारणात तुम्ही लोक सांभाळले, कार्यकर्त्यांची काळजी घेतली तरच तुम्ही नेते होऊ शकता, असेही विजय शिवतारे यांनी म्हटले. 

एकनाथ शिंदेंच्या फ्लोअर मॅनेजमेंटमुळे महायुतीचा कोल्हापूरचा उमेदवार निवडून येईल: विजय शिवतारे

निव्वळ माझ्या पक्षाचा आमदार आहे म्हणून त्याला गुलामाप्रमाणे वागवून चालवत नाही. आज कोल्हापूरमध्ये धैर्यशील पाटील आणि संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदे संपूर्ण दिवस मेहनत घेत आहेत, भेटीगाठी घेऊन फ्लोअर मॅनेजमेंट करत आहेत. त्यामुळे कोल्हापुरात महायुतीचा उमेदवार 100 टक्के निवडून येईल, असा दावा विजय शिवतारे यांनी केला. कार्यकर्ते, आमदार, खासदार सांभाळले आणि लोकांची काळजी घेतली तरच तुम्ही नेते होऊ शकता. आता लाटेवर निवडून येण्याचे दिवस गेले, असे विजय शिवतारे यांनी सांगितले. 

आणखी वाचा

फाटली, पलटी मारली, अजित पवार मंचावर असताना विजय शिवतारे काय काय म्हणाले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget