एक्स्प्लोर

Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार

केंद्रीयमंत्री मंडळाचा विस्तार होणार असून श्रीकांत शिंदेंना कॅबिनेटमंत्रीपदी संधी देण्यात येईल, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता.

मुंबई : शिवसेना (Shivsena) उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन, जाहीर सभांतून जोरदार हल्लाबोल केला.  धाराशिवमधील सभेत, आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? असे म्हणत ओमराजेंच्याच भाषणाचा दाखला खरपूस समाचार घेतला. त्यानंतर, आज शिर्डी मतदारसंघात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर निशाणा साधत आपल्या दौऱ्याचा शेवट केला. या दौऱ्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा खासदारांवर आणि भाजप-शिंदेसेनेवर टीका केली. यावेळी, पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदेंना (Shrikant shinde) कार्ट असं त्यांनी म्हटलं. आता, उद्धव ठाकरेंच्या या टिकेला शिंदेंच्या शिवसेनेनं उत्तर दिलं आहे. 

शिर्डीत उद्धव ठाकरेनी पत्रकार परिषेदतून भाजपसह एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. शिवसेना एकच असून ती बाळासाहेबांची आहे, दुसरी शाहसेना असून एकनाथ शिंदेंना अमित शाहांनी सुपारी दिल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान, यावेळी केंद्रीयमंत्री मंडळाचा विस्तार होणार असून श्रीकांत शिंदेंना कॅबिनेटमंत्रीपदी संधी देण्यात येईल, असा प्रश्न पत्रकाराकडून उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत, लायकी नसली तरी आपलं कार्ट मंत्री झालं पाहिजे ही शाहसेनच्या प्रमुखाची इच्छा आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला होता. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून शिवसेना शिंदे गटाच्या नेटीझन्सकडून उद्धव ठाकरेंना ट्रोल केलं जात आहे. तर, आता खासदार नरेश म्हस्के यांनी या वक्तव्यावरुन पलटवार केला आहे. 

शेंबड्या पोराला आमदार केलं

श्रीकांत शिंदे हे तीन वेळेचे खासदार आहेत, लाखोंच्या फरकाने ते निवडून आले आहेत. खासदार होताना कुणाचाही बळी दिलेला नाही, याउलट श्रीकांत शिंदेंना जर कार्ट म्हणत असाल तर तुमचं शेंबडं पोरगं, त्याला शेंबूडही काढता येत नव्हता, तेव्हा दुसऱ्याच्या मतदारसंघात त्याला उभं केलं, असा पलटवार नरेश म्हस्केंनी ठाकरेंवर केला. सुनील शिंदेसारख्या कार्यकर्त्याचा बळी दिला. सचिन अहिरसारखा राष्ट्रवादीतून उभा राहिल म्हणून त्याला शब्द दिला. किशोरी पेडणेकरांना घरी बसवलं, तीन-तीन लोकांचा बळी देऊन आपल्या शेंबड्या पोराला आपण आमदार बनवलं. एकनाथ शिंदे घरोघरी, दारोदारी फिरलं म्हणून आपलं शेंबडं पोरगं आमदार बनलं, अशा शब्दात नरेश म्हस्केंनी ठाकरेंवर बोचरी टीका केली. 

हेही वाचा

Uddhav Thackeray: ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नाही; मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget