एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : वाशिमच्या सभेत उद्धव ठाकरेंकडून पुढचं पाऊल, आगामी निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी वाशिमच्या सभेत डॉ. सिद्धार्थ देवळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना मतदारसंघात बांधणी करण्याचे आदेश देखील दिलेत.

Uddhav Thackeray Siddharth Deole वाशिम : ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरु केला आहे. उद्धव ठाकरेंनी यवतमाळमध्ये सभा घेतल्यानंतर वाशिममध्ये देखील सभेला संबोधित केलं. यानंतर त्यांची हिंगोली येथे देखील सभा पार पडली आहे. मात्र, वाशिमच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाषण संपवत असातना डॉ. सिद्धार्थ देवळे यांना मंचावर बोलावत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश दिले. सिद्धार्थ देवळे यांना वाशिम विधानसभा मतदारसंघातून तयारी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी तीन वर्ष अगोदरच दिल्यानं त्यांच्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे काय म्हणाले?

यवतमाळ वाशिम हा आपला लोकसभा मतदारसंघ आहे. आतापर्यंत काय व्हायचं, संपर्ण मतदारसंघात खासदार यायचा, तो खाली तू वरती मी असं सेटिंग करायचा.खाली एकच यायचा तो म्हणायचा खाली मी वरती तू, आता असं नाही. आता मला आमदार पण पाहिजे आणि खासदार पण पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सिद्धार्थ देवळे यांना गेल्या वेळी 1 लाख 4 हजार मतं मिळाली होती, वाशिम मतदारसंघात पुढील वेळी त्यांना आमदार करायची जबाबदारी तुमची आहे.  आतापासून तयारीला लागा, निवडणुकीसाठी जी बांधणी करावी लागते, ती करा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

Siddharth Deole : कोण आहेत डॉ.सिद्धार्थ देवळे? 

डॉ.सिद्धार्थ आकारामजी देवळे वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांनी एम.बी.बी.एस एमडी मेडिसिन शिक्षण पूर्ण केलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल होण्यापूर्वी ते वंचित बहुजन आघाडीत कार्यरत होते. डॉ. देवळे यांनी 2019 ची  विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी कडून लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. डॉ. देवळे यांना त्यावेळी 53 हजारांच्या जवळपास मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विदर्भ प्रमुख या पदावर डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी पाच वर्ष काम केलं. सिद्धार्थ देवळे 2024 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात दाखल झाले. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली आणि 1,04,000 मत मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. 20 हजार मतांच्या फरकाने डॉ. सिद्धार्थ देवळे यांचा पराभव झाला होता. सध्या ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाशिम जिल्हा समन्वयक असून उद्धव ठाकरेंनी त्यांना 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्यास सांगितलं आहे. 

उद्धव ठाकरे यांनी वाशिमच्या सभेत डॉ. सिद्धार्थ देवळे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता शिवसैनिक मतदारसंघात कशा प्रकारे तयारी सुरु करतात ते पाहावं लागेल. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Embed widget