Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, मराठवाड्यातील मातब्बर नेता मुख्यमंत्र्यांकडे; शिंदेंनी मोठा मासा गळाला लावला
Uddhav Thackeray, जालना : उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात मोठा धक्का बसलाय. राजेश टोपेंच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या नेत्याने साथ सोडलीये.
Uddhav Thackeray, जालना : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठवाड्यात मोठा धक्का बसलाय. जालन्यातील घनसावंगी येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख हिकमत उढाण यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना राम राम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हिकमत उढाण हे घनसावंगी विधानसभेतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्या विरोधातील प्रबळ दावेदार समजले जातात. त्यांच्या या पक्ष प्रवेशाने मतदारसंघात राजेश टोपे यांच्या समोर पुन्हा एकदा नव्याने आव्हान उभे राहणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत केवल 3 हजार मतांच्या फरकाने त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
मविआ सोडून मूळ शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला
हिकमत उढाण म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये ज्याच्या विरोधात आम्ही आयुष्यभर संघर्ष केला त्यांनाच मंत्री पदाची शपथ दिली. आपल्याच पाठिंब्यावर आपल्याच विरोधकांना मोठ करण्याचं काम करण्यात आलं. त्यावेळी अतिशय वेदना झाल्या. आम्ही आशेवर होतो की कधी ना कधी ही माविआ तुटेल. पुन्हा एकदा भाजप शिवसेना समविचारी पक्ष एकत्र येतील. मात्र आता आम्ही ती आशा सोडली. म्हणून मविआ सोडून मूळ शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
2019 निवडणुकीला गोळी कानावरून गेली यावेळी गोळी डोक्यात घुसेल : हिकमत उढाण
पुढे बोलताना हिकमत उढाण म्हणाले, या मतदासंघात ऊसाच मोठ राजकारण केलं गेलं, आपला ऊस जाणारं नाही म्हणुन इथल्या जनतेत भीती निर्माण करण्याचं काम विरोधकांनी केलं. 2019 निवडणुकीला गोळी कानावरून गेली यावेळी गोळी डोक्यात घुसेल, अशा इशाराही हिकमत उढाण यांनी राजेश टोपे यांना दिला.
#जालना जिल्ह्यातील ब्लू सफायर युनिट -२ चा भूमिपूजन सोहळा आणि भव्य शेतकरी मेळावा आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. याप्रसंगी हिकमत उढाण यांनी ' भगवा ' हाती घेत त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. हिकमत उढाण हे हाडाचा कार्यकर्ता असून फक्त वंदनीय… pic.twitter.com/PlnnLqqkNb
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 14, 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, लेक लाडकी योजना असे अनेक निर्णय आम्ही सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून घेतले. केलेल्या कामांच्या बळावर आम्ही तुमच्यासमोर उभे असून तुमच्या भक्कम साथीची आता सरकारला गरज असल्याचे यावेळी सांगितले. अजूनही २००५ पूर्वीच्या… https://t.co/wZ5OpyHprZ pic.twitter.com/FwX1YoqTc1
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 14, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या