एक्स्प्लोर

'ऑपरेशन टायगर'बाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार फुटण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण

आम्हाला ऑपेरेशन टायगरची गरज नाही, असे म्हणत मंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) 20 खासदारांनी स्वतंत्र गट निर्माण केल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे तृणमूलच्या खासदारांची चर्चा असताना, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) खासदारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला केवळ 4 खासदार प्रत्यक्षात उपस्थित होते. तर, इतर 5 खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याने तर्क-वितर्क काढले जात आहेत. मात्र, ऑपरेशन टायगरबाबत आता शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी महत्त्वाची माहिती दिली.  

उबाठाच्या कोणत्याही खासदारासोबत संपर्क नाही, अशी कोणतीही मीटिंग झाली नाही. आम्हाला ऑपेरेशन टायगरची गरज नाही, असे म्हणत मंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच, संजय राऊत यांच्या पेशन्सला दाद देत त्यांनी उबाठाचं अस्तित्व टिकवलं आहे, असेही उदय सामंत यांनी म्हटलं. त्यामुळे, एकप्रकारे उदय सामंत यांनी ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात नसल्याचेच सूचवलं आहे. 

आता, ठाकरेंच्या आमदारांचीही बैठक

खासदारांची बैठक घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरेंकडून आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. सोमवार 22 जून 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता "शिवालय", मंत्रालयासमारे, मुंबई येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) विधीमंडळ पक्षाच्या विधानसभा व विधानपरिषदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत.
तरी, वरील बैठकीस सर्व सन्माननीय सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे पत्रच पक्षाचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांच्या सहीने जारी करण्यात आले आहे. 

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, स्वागत

दरम्यान, राष्ट्रहितासाठी घडामोड होत असेल तर चांगले आहे, ⁠उबाठाचे खासदार देश हितासाठी सोबत येत असतील तर स्वागत आहे, असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया दिली. तसेच, ⁠अटल बिहारी वाजपेयींचे सरकार असताना काँग्रेसने काय केलं, असेही त्यांनी म्हटलं.

संजय राऊत शरण गेले नाहीत - सावंत

संजय राऊत शरण गेले नाही, खमक्या नेता आज कार्यक्रमाला आला आहे, कामगाराला न्याय देणारी आमची भारतीय कामगार सेना आहे, असे म्हणत खासदार अरविंद सावंत यांनी संजय राऊतांचे कौतुक केले. तसेच, शिवसेना पक्ष चिन्ह हे लोक घेऊन गेले, अजून न्याय मिळाला नाही, 4 वर्ष झाले. एखादा गट पक्षातून फुटतो त्याला दुसऱ्या पक्षात मर्ज व्हावं लागतं जे आता बंगालमध्ये झालं. पण, येथे यांनी आपलीच शिवसेना घेऊन गेले, ते दुसऱ्या पक्षात मर्ज झाले नाहीत, असे म्हणत अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा मुद्दा उपस्थित केला. 

हेही वाचा

अहिल्यानगरमधील एका धोंड्याला फार मिर्ची लागली; रोहिणी खडसेंची विधानपरिषद सभपतींवर बोचरी टीका

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Embed widget