एक्स्प्लोर

अहिल्यानगरमधील एका धोंड्याला फार मिर्ची लागली; रोहिणी खडसेंची विधानपरिषद सभपतींवर बोचरी टीका

रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, आम्ही रोजगार मागितला, मूळ प्रश्नावर बोललो तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका धोंड्याला फार मिर्ची लागली.

जळगाव : अधिक मास म्हणजेच धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाचा महिना संपला आहे. मात्र, धोंडे जेवणाच्या कार्यक्रमावरुन भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा दिसून आली. जावयांनी आणि सासरच्या मंडळींनी कार्यक्रमाचे व्हिडिओ देखील व्हायरल केले आहेत. तर, काही नेतेमंडळींनी आपल्या मतदारसंघातही (Jalgaon) असे कार्यक्रम घेतले. त्यावरुन, आता विधानपरिषद सभापती राम शिंदे (Ram shinde) आणि शरद पवाराच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यात शा‍ब्दिक वाद रंगल्याचं दिसून आलं.   

आम्ही रोजगार मागितला, मूळ प्रश्नावर बोललो तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका धोंड्याला फार मिर्ची लागली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सभापती राम शिंदे यांच्यावर नाव न घेता केली आहे. सभापती राम शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मतदारसंघात जाहीर धोंडे जेवणाचा कार्यक्रम घेतला होता. त्यावरून रोहिणी खडसेंनी, धोंडे जेवणाऐवजी रोजगार मेळावा आयोजित करा असा सल्ला राम शिंदे यांना दिला होता. त्यानंतर, राम शिंदे यांनीही रोहिणी खडसे यांच्यावर टीका केली. आता, रोहिणी खडसेंनी पुन्हा एकदा राम शिंदेंवर बोचरी टीका करत प्रत्त्युत्तर दिल. 

रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, आम्ही रोजगार मागितला, मूळ प्रश्नावर बोललो तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका धोंड्याला फार मिर्ची लागली. मग धोंड्याने हिंदू संस्कृती जपण्याच्या बाता मारल्या. यांचं हिंदुत्व किती दुटप्पीपणाचे आहे बघा... हे गुंडांना पोसतात, त्यांना देशाबाहेर पळून जाण्यास मदत करतात. ज्या गुंडांनी असंख्य लोकांची हत्या केली, अनेकांना त्रास दिला, त्यांना हे मदत करतात. आपला हिंदू धर्म हे सांगतो का ? नाही !, असे म्हणत रोहिणी खडसेंनी राम शिंदेंना टोला लगावला आहे. निलेश घायवाळ, युवराज काशीद आणखी किती नावे घेऊ? ज्यांना या धोंड्याने मदत केली आहे. मी जर यांची कुंडली काढायचं ठरवले तर राजकारणाला 'राम-राम' करावा लागेल, असेही रोहिणी खडसेंनी म्हटले आहे. 

राम शिंदेंनी काय केली होती टीका

रेव्ह पार्टी करणाऱ्यांना धोंडे जेवणाचं महत्त्व काय समजणार असा टोला राम शिंदे यांनी रोहिणी खडसेंच्या टीकेला उत्तर देताना लगावला होता. राम शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे गावातील मुली आणि जावयांसाठी धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या आयोजनावरुन रोहिणी खडसेंनी टीका केली होती. 

हेही वाचा

Manoj Jarnage: तुकाराम मुंढेंची बदली करू नका, त्यांनी चांगला दणका दिलाय; जरांगे पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Symbol Case : अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं, कपिल सिब्बलांचा युक्तिवाद, निवडणूक आयोगाच्या निर्णयाची चिरफाड
Shiv Sena Symbol Case : अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं, कपिल सिब्बलांचा युक्तिवाद, निवडणूक आयोगाच्या निर्णयाची चिरफाड
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
Pune Chakan MIDC: खड्ड्यांमुळे चाकण MIDC चे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार
खड्ड्यांमुळे चाकण MIDCचे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार
Manoj Jarange Patil: सत्तेतील एकनाथ शिंदे आणि दादांच्या राष्ट्रवादीची अवस्था दाताच्या कवळीसारखी, मनोज जरांगेंचं टीकास्त्र
सत्तेतील एकनाथ शिंदे आणि दादांच्या राष्ट्रवादीची अवस्था दाताच्या कवळीसारखी, मनोज जरांगेंचं टीकास्त्र
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget