एक्स्प्लोर

तुळजापुरात ड्रग्जचा बाजार, पेडलर पुजाऱ्यांचे सर्वपक्षीय राजकीय कनेक्शन समोर, ओमराजे निंबाळकर म्हणाले....

भाविकांच्या तुळजापुरात ड्रग्जचा बाजार, पेडलर पुजाऱ्यांचे सर्वपक्षीय राजकीय कनेक्शन समोर, नक्की कोणाचा संबंध? यावर आतापर्यंंत काय काय उघड झालं? वाचा

Tuljapur Drug Case Political Connection: तुळजापूर ड्रग प्रकरणात 13 पुजाऱ्यांचा संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर आता या पुजाऱ्यांचे राजकीय कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणात सर्वच पक्षांचे मिलीभगत असल्याचं दिसून येत आहे . या प्रकरणातील राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे दोघे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा समोर आलं आहे . ड्रग प्रकरणातील या आरोपींचे खासदार ओमराजे निंबाळकरांसोबत फोटो व्हायरल झाल्याने काही दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती .तर विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे चंद्रकांत उर्फ बाबू कने,विनोद गंगणे, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष हे भाजपशी संबंधित आहेत .तुळजापूर प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 35 आरोपी आहेत त्यातले 13 आरोपी पुजारी असल्याचं सूत्रांचे म्हणणे आहे .पण या पुजाऱ्यांचा रोजच्या पुजाऱ्यांशी संबंध नाही असे पुजारीची भूमिका आहे . (Tuljapur Drug Case)

काही दिवसांपूर्वीच तुळजापूर ड्रग प्रकरणात आरोपींसोबत फोटो व्हायरल झाल्या प्रकरणे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यात आरोपींवरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते .काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर तुळजापूर प्रकरणातील आरोपींचे फोटो दाखवत हे आरोपी राणा पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला होता .तर खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आरोपींसोबत फोटो ही व्हायरल झाले होते .या प्रकरणात सर्वच पक्षांचे आरोपी असल्याचे उघड होत आहे .त्यामुळे तुळजापूर ट्रक प्रकरणाशी जोडला गेलेला राजकीय वरदहस्त हाही गंभीर प्रश्न समोर आला आहे .

ओमराजे निंबाळकर म्हणाले...

तुळजापूर ड्रग प्रकरणात आरोपी  चंद्रकांत कने याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार केला होता .तर ट्रक प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे हे भाजपशी संबंधित आहेत .यावर खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले,'या प्रकरणाचा सगळ्यात पहिल्यापासून मी पाठपुरावा करत आहे .केवळ लोकप्रतिनिधी म्हणून हा पाठपुरावा करत नाही इथला जबाबदार नागरिक म्हणून करत आहे .आपल्या जिल्ह्याच्या तरुणांवर या ड्रगचा किती खोलवर परिणाम होतो त्याची मला जाणीव आहे .तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जाऊ नये ही माझी मानसिकता आहे .यासंदर्भात मी गृहमंत्री अमित शाह यांनाही पत्र लिहिलं आहे .यात सेंट्रल नार्कोटिक्सला ही मी पत्रव्यवहार केले आहेत .संसदेत मी हा विषय उचलला आहे .स्थानिक एसपींची मी संपर्कात आहे .

या प्रकरणात आमचा सख्खा भाऊ जरी असला किंवा कोणी जरी असेल तर त्याच्यावरही कारवाई होणारच असे ओमराजे निंबाळकर म्हणाले .व्हायरल फोटोविषयी बोलताना ते म्हणाले, मी कायम लोकांच्या संपर्कात असतो. जर कोणी माझ्यासोबत फोटो काढायला आला तर मला तुम्ही कोण आहात हे विचारणं शक्य नसतं असंही ते म्हणाले .यात भाजपशीही संबंधित कोणी असेल तरी मी त्याला पक्षाशी जोडत नाही .संबंधित आरोपीला आरोपीसारखं वागवून त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी असल्याचं निंबाळकर म्हणाले . दरम्यान, सरसकट पुजाऱ्यांना बदनाम करू नका, याचा रोजच्या पुजाऱ्यांशी संबंध नसल्याचं पुजारी मंडळाचे विनित शिंदे यांचं म्हणणं आहे.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात कोणते आरोपी समाेर?

तुळजापुरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील महिला संगीता गोळेकडून ड्रग्ज पुरवठा होत असल्याचे समोर आल्यानंतर तुळजापुरातील काही आरोपी या रॅकेटमध्ये सामिल असल्याचे समोर आले. मुंबईतून सोलापूर मार्गे तुळजापुरात ड्रग्ज सप्लाय झाल्याचे समोर आल्यानंतर तामलवाडी टोल नाक्यावर पहिल्यांदा ड्रग्ज कारवाई करण्यात आली. तुळजापुरात गेल्या तीन वर्षांपासून ड्रग्ज तस्करी होत असल्याचा पुजाऱ्यांचा आरोप होता. यात आतापर्यंत 35 जण आरोपी असून तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली.

त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 फेब्रुवारी,संतोष खोतला 27 फेब्रुवारी,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण,  ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 3 जणांना 16 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 30 पुड्या ड्रग्जसह 4 मार्च रोजी अटक करण्यात आली. पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके या दोघांना 23 मार्चला, राहुल कदम-परमेश्वर याला 24 मार्चला अटक केली त्या दिवशी 4 गोपनीय व नवीन 6 अशी 10 जणांची नावे उघड केली. गजानन हंगरकर याला 25 मार्चला अटक केली त्यानंतर पोलिसांनी कोर्टात 26 मार्चला नवीन 10 आरोपींची नावे जाहीर केली.

हेही वाचा:

मोठी बातमी: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, तुळजाभवानी मंदिराचे 13 पुजारी पेडलर? आतापर्यंतचा घटनाक्रम पहा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Superstar First Appeared In Front Of Camera: 47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
Mumbai Traffic : अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट

व्हिडीओ

Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Superstar First Appeared In Front Of Camera: 47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
Mumbai Traffic : अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
Embed widget