एक्स्प्लोर

Thane MNS Video: 24 तासात भैय्याचा उतरला माज; राज ठाकरेंसह अविनाश जाधवांना अश्लील शिवीगाळ, दारुची नशा उतरताच मनसेच्या भीतीने पोलिसांकडे धाव

Thane Video: अवघ्या २४ तासांमध्ये हा परप्रांतीय रिक्षाचालक भानावर आला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राज ठाकरेंची माफी मागितली. एवढंच नाहीतर त्याने कान धरून उठबश्याही काढल्या आहेत.

ठाणे: ठाणे शहरातील (Thane) पोखरण रोड नं. २ गांधीनगर येथील अनिल वाइन्ससमोर दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली होती. किरकोळ वादातून एका ऑटोचालकाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाणे–पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्याविरोधात अयोग्य व अभद्र भाषा वापरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे हा रिक्षाचालक उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसेनं (MNS) पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. स्वत: मनसे नेते अविनाश जाधव यांनीच याबाबत माहिती दिली होती. पण, अवघ्या २४ तासांमध्ये हा परप्रांतीय रिक्षाचालक भानावर आला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राज ठाकरेंची माफी मागितली. एवढंच नाहीतर त्याने कान धरून उठबश्याही काढल्या आहेत.

Thane Video: पोलीस स्टेशन गाठत माफी मागितली आणि उठाबशा काढल्या

⁠ठाण्यातील गांधीनगर परिसरात ही घटना घडली होती.  शैलेंद्र संतोष यादव असं या परप्रांतीय रिक्षा चालकाचं नाव आहे. किरकोळ कारणावरून रिक्षाचालक शैलेंद्र यादव आणि एका मराठी तरुणामध्ये बाचाबाची झाली होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिक्षाचालक भानावर आला आणि थेट पोलीस स्टेशन गाठत माफी मागितली आणि उठाबशा काढल्या. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या सर्व घटनेनंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Thane Video: त्याबद्दल मी हात जोडून माफी मागतो

त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, 'मी शैलेंद्र संतोष यादव, हात जोडून विनंती करतो आणि मी सॉरी म्हणतो.  काल गांधी नगर येथील मनसेच्या शाखेसमोर रिक्षा लावत होतो. त्यावेळी एक अनोळखी माणूस आला, त्या माणसासोबत माझा वाद झाला. वादातून भांडणं झालं होतं. त्यानंतर राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांच्याबद्दल बोलताना माझ्या तोंडातून अपशब्द आले आणि शिव्या निघाल्या. त्याबद्दल मी हात जोडून माफी मागतो. या पुढे असं काही होणार नाही. मी एक रिक्षावाला आहे, रिक्षा चालवून घर कसंबसं चालवतो.  मी या पुढे अशी कोणतीही चूक करणार नाही.  मी दारूच्या नशेत होतो, त्यामुळे मी असं बोललो. त्यामुळे हात जोडून माफी मागतो, असं म्हणत या रिक्षाचालकाने कान धरून उठबश्या मारल्या.

Thane Video: नेमकं काय घडलं होतं?

“कौन राज ठाकरे, कौन अविनाश जाधव सब मेरे लं… “ ⁠”ये ठाणे का गांधीनगर है, यहा भैय्या का राज चलता है” ⁠”इधर कोई भी मराठी आया तो उसकी ….” अशा शब्दात परप्रांतिय रिक्षाचालकाने मनसे नेत्यांबद्दल अश्लिल भाषेचा वापर करत शिवीगाळ केली होती. ठाण्यातील गांधी नगरमध्ये परप्रातींय रिक्षाचालकाने दारु पिऊन धुडगूस घातला होता. प्राथमिक माहितीनुसार, रिक्षा लावण्यावरुन हा झाला वाद झाला होता. या वादानंतर ठाण्यातील गांधीनगर परीसरातील काही परप्रांतीय तरुणांनी मराठी तरुणाला शिविगाळ करुन हुसकावून लावले. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विषयी अभ्रद्र शिविगाळ करत मनसे नेते अविनाश जाधव यांना मारहाण करु अशा शब्दांचा प्रयोग करण्यात आल्याने मनसेही आक्रमक झाली होती. 

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते, मनसैनिकांनी पोलीस ठाण्यातच त्याला मारहाण केली. त्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम हा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये झालेला आहे आमच्या मनसैनिकांनी त्याला जो महाप्रसाद द्यायचा तो पोलीस स्टेशनच्या आतून दिलेला आहे. जो कोणी राज ठाकरे यांच्या बाबतीत बोलायची हिंमत करेल तो कुठे आहे याचा आम्ही कधीही विचार करणार नाही. तो जगातील कोणत्याही कोपऱ्यात असेल, त्याला महाराष्ट्र सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली होती. 

हे ही वाचा - कौन राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आईचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आईचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
Embed widget