राजन विचारे विरुद्ध रवींद्र फाटक लढत 99 टक्के निश्चित, दिघेंच्या दोन शिष्यांमध्ये ठाणे लोकसभेसाठी लढाई?
Thane Lok Sabha Constituency : दिवगंत आनंद दिघे यांच्या दोन शिष्यांमध्ये ठाणे लोकसभेची लढाई आता जवळपास निश्चित झाली आहे.
Thane Lok Sabha Constituency : दिवगंत आनंद दिघे यांच्या दोन शिष्यांमध्ये ठाणे लोकसभेची (thane loksabha 2024) लढाई आता जवळपास निश्चित झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाण्यामध्ये रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचं समजतेय. महायुतीमध्ये ठाणे मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्याकडे आला आहे. त्यामुळे ठाण्यात ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. ठाकरेंकडून राजन विचारे यांना पुन्हा मैदानात उतरवलं जाणार आहे, तर शिंदेंनी त्यांच्याविरोधात फाटक यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्याची लढाई प्रतिष्ठेची झाली आहे.
राजन विचारे विरुद्ध रवींद्र फाटक लढत
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेचे माजी आमदार रविंद्र फाटकांना ठाणे लोकसभेची उमेदवारी 99 टक्के निश्चित झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये रवींद्र फाटकांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती शिंदेंच्या शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे विरूद्ध रविंद्र फाटक अशी लढत होणार आहे. रविंद्र फाटक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
किरण सामंत यांचा मार्ग मोकळा
रवींद्र फाटक हे दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी फाटक यांनी फिल्डिंग लावली होती. एकनाथ शिंदे यांनी फाटक यांना ठाण्यातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचं समजतेय. त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये किरण सामंत यांचा दावा अधिक मजबूत झालाय. रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदार संघामधून उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत हे सुद्धा इच्छुक आहेत. रवींद्र फाटक हे ठाण्यामधून निवडणूक लढवणार हे जवळजवळ निश्चित झाल्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी किरण सामंत यांचा दावा अधिक मजबूत होत आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघातील बलाबल काय ?
ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात. त्यापैकी ठाणे शहर या ठिकाणी भाजपचा आमदार संजय केळकर आहे तर ओवला माजिवडा या मतदार संघात शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक हे आहेत. कोपरी पाचपखाडी मतदार संघाचे नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतं आहेत. तर मीरा भाईंदर या मतदारसंघात अपक्ष आमदार गीता जैन या विजय झाल्या आहेत. नवी मुंबईचे दोन मतदार संघाचे भाजपचे नेते गणेश नाईक यांचा कडे ऐरोली मतदार संघ आहे. तर मंदा मात्रे यांच्याकडे बेलापूर मतदार संघ आहे. लोकसभेचे चित्र पाहता महायुतीकडे सर्वच आमदार हे या क्षेत्रात आहे क्षेत्रात. त्यामुळे महाविकास आघाडीचे खासदार राजन विचारे यांना यांना निवडणुकीत विजय होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. ही निवडणूक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त खासदार राज्य मधून निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी आहे.
1. ठाणे शहर मतदार संघ संजय केळकर (भाजप)
2.कोपरी पाचपखाडी एकनाथ शिंदे (शिवसेना)
3.ओवला माजिवडा मतदार संघ प्रताप सरनाईक (शिवसेना)
4.मिरा भाईंदर मतदार संघ अपक्ष आमदार गीता जैन
5.ऐरोली मतदार संघ गणेश नाईक (भाजप)
6.बेलापूर मतदार संघ मंदा म्हात्रे (भाजप)