Thackeray vs Shinde : ठाण्यातील शिवसेनेच्या कुंभारवाडा शाखेवर दावा करण्यासाठी ठाकरे-शिंदे गट भिडले
Thackeray vs Shinde : ठाणे जिल्ह्यातील कोपरीमधल्या शिवसेना शाखेसाठी ठाकरे आणि शिंदे गट भिडले. कुंभारवाडा शाखा ताब्यात घेण्यावरुन दोन्ही गट आमनेसामने आले. त्यानंतर सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Thackeray vs Shinde : धनुष्यबाण चिन्ह कोणाचं, खरी शिवसेना (Shiv Sena) कोण यावरुन वाद सुरु असतानाच ठाकरे आणि शिंदे गटाचे (Shinde Group) कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं ठाण्यात पाहायला मिळालं. ठाणे (Thane) जिल्ह्यातील कोपरीमधल्या शिवसेना शाखेसाठी ठाकरे आणि शिंदे गट भिडले. कुंभारवाडा शाखा (Kumbharwada) ताब्यात घेण्यावरुन दोन्ही गट आमनेसामने आले. मनोरमानगरमध्ये असलेल्या या शाखेबाहेर दोन्ही गटात राडा पाहायला मिळाला. त्यानंतर सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे गटाचे (Thackeray) कार्यकर्ते आज (7 ऑक्टोबर) कुंभारवाडा शाखेत बसले असताना शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित झाल्याने वाद वाढला. यावेळी शिंदे गटातील स्थानिक लोकांनी शाखेवर हक्क दाखवल्यामुळे उद्धव ठाकरे गटाने जोरदार विरोध केला. यावेळी दोन्ही गटांमधील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या वादाची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अधिकच चिघळला.
दोन्ही गटाकडून समंजस्याने शाखेत बसण्याची वेळ ठरणार
कुंभारवाडा इथल्या शिवसेनेच्या शाखेची डागडुजी आणि देखभाल वर्षानुवर्षे आम्हीच करत आहोत, असं सांगत शिंदे गटाने या शाखेवर दावा सांगितला. आम्ही बाहेरच्या लोकांना शाखा ताब्यात घेऊ देणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली. शिवसैनिकही तितकेच आक्रमक होते. त्यामुळे हा वाद चिघळला. अखेर पोलिसांच्या उपस्थितीत या शाखेला टाळं लावण्यात आलं. या टाळ्याच्या दोन चाव्यांपैकी एक चावी ठाकरे गट आणि एक चावी शिंदे गटाकडे देण्यात आली आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते याठिकाणी वेगवेगळ्या वेळेत बसतील, असा तोडगा तूर्तास काढण्यात आला. आताा दोन्ही गटांकडून सामंजस्याने शाखेत बसण्याची वेळ ठरणार आहे.
VIDEO : Shinde Thackeray Groups On Shivsena Shakha : ठाण्यात कोपरीतल्या शाखेसाठी ठाकरे - शिंदे गट भिडले