एक्स्प्लोर

Thalapathy Vijay : विजय यांच्या मुख्यमंत्रिपदामध्ये अडथळे, राज्यपाल मॅजिक फिगरवर अडून, सरकार स्थापनेचं निमंत्रण नाहीच

TVK Vijay Tamil Nadu Government Formation : तमिळनाडूत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून TVK प्रमुख विजय यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा सादर केला आहे. 

Thalapathy Vijay Tamil Nadu Government : तमिळनाडूमध्ये सरकार स्थापनेबाबत सुरू असलेला सस्पेन्स अजून तरी संपुष्टात येण्याची चिन्हं दिसत नाहीत. तमिळगा वेत्री कळघमचे (TVK) प्रमुख विजय यांनी गुरुवारी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. आवश्यक संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचा दावा विजय यांनी केला असून शपथविधीनंतर विधानसभा सभागृहात सहज बहुमत सिद्ध करू, असा विश्वासही त्यांनी राज्यपालांना दिला. असं असलं तरी राज्यपाल मात्र बहुमताच्या आकड्यावर अडून असल्याची माहिती आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, विजय यांनी सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांची आणि आमदारांची माहिती राज्यपालांकडे सादर केली. सरकार स्थिर राहील आणि कोणतीही राजकीय अस्थिरता निर्माण होणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं. विजय यांच्या दाव्यावर राज्यपाल समाधानी नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांना औपचारिकरित्या सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्यात नसल्याची माहिती आहे.

Tamil Nadu Government Formation : शपथविधी सोहळा लवकरच

तमिळनाडूतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विजय यांच्या नेतृत्वाखालील नव्या आघाडीला जर राज्यपालांनी निमंत्रण दिलं तर राज्यपाल त्यांना सत्तास्थापनेसाठी बोलावू शकतात. असं झालं तर शपथविधी शुक्रवार किंवा शनिवारी चेन्नईमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सोहळ्यासाठी TVK चे वरिष्ठ नेते, मित्रपक्षांचे प्रतिनिधी आणि देशभरातील अनेक प्रमुख राजकीय नेत्यांना निमंत्रित केलं जाणार असल्याची चर्चा आहे.

यापूर्वी बुधवारी विजय यांनी लोकभवन येथे राज्यपालांची भेट घेत TVK आणि काँग्रेसच्या आमदारांची यादी सादर केली होती. मात्र त्यावेळी राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे गुरुवारी होणारा संभाव्य शपथविधी सोहळा पुढे ढकलण्यात आला होता.

VCK Support Decision : व्हीसीकेचा निर्णय अद्याप बाकी

दरम्यान, व्हीसीकेचे नेते थोल तिरुमावलवन यांनी TVK कडून पाठिंब्याची विनंती करण्यात आल्याची माहिती दिली आहे. पक्षाची उच्चस्तरीय समिती लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आम्हाला TVK कडून पत्र मिळालं आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही. पक्षाच्या समितीत चर्चा करून समर्थन द्यायचं की नाही यावर निर्णय घेतला जाईल, असं तिरुमावलवन यांनी म्हटलं आहे.

तामिळनाडूतील पक्षीय बलाबल - एकूण 234

  • TVK (विजय) - 108
  • DMK - 59
  • AIADMK - 47
  • काँग्रेस - 5
  • PMK - 4
  • मुस्लिम लिग - 2
  • कम्युनिस्ट पक्ष - 2
  • VCK - 2
  • मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - 2

Vijay Political Rise : विजय यांच्या राजकीय प्रवासाकडे देशाचं लक्ष

चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून लोकप्रिय असलेले विजय आता तमिळनाडूच्या राजकारणात मोठा चेहरा बनले आहेत. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत TVK ला मिळालेल्या यशानंतर विजय मुख्यमंत्रिपदाच्या दिशेने वाटचाल करत असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष तमिळनाडूकडे लागलं आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar VIDEO : मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Embed widget