राज ठाकरेंकडून अपरिपक्व वक्तव्य अजिबात अपेक्षीत नाही, नैराश्यातून आरोप; सुषमा अंधारेंचा जोरदार पलटवार
परमबीर सिंह पुरावा केव्हा देणार? फडणवीस, परमबीर सिंह, अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट केली पाहिजे, असे अनिल देशमुख म्हणाले.
अमरावती : शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपल्या नादाला लागू नये असा थेट इशारा राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आज संभाजीनगरात दिला. माझा मोहोळ उठला तर तुम्हाला निवडणुकीसाठी साधी सभाही घेता येणार नाही असं राज ठाकरे म्हणाले. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केलेला आरोप नैराश्यतून असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केला आहे. त्या अमरावतीत माध्यमांशी बोलत होत्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या, राज ठाकरेकडून असं अपरीपक्व वक्तव्य अजिबात अपेक्षीत नाही. पण काल जे झालं बीडमध्ये त्याच मी समर्थन करू शकत नाही. राज ठाकरे हे नैराश्यतून वक्तव्य करत असतील
फडणवीस, परमबीर सिंह, अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट करा : सुषमा अंधारे
सुषमा अंधारे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस साहेबांनी चांगली स्क्रिप्ट लिहून दिली पाहिजे. चांदीवाल समितीने सहा वेळा समन्स पाठवलं परबसिंह यांना पण ते आले नाही.न्यायालयाचा अपमान करून परमबीर सिंह खोटं बोलत आहे. त्यांच्यावर सुमोटो दाखल केला पाहिजे. जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर केव्हा देणार? साडेतीन मुहूर्त शोधताय का? परमबीर सिंह पुरावा केव्हा देणार? फडणवीस, परमबीर सिंह, अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट केली पाहिजे..
बच्चू कडू शरद पवार भेटीवर मला काही कल्पना नाही : सुषमा अंधारे
महायुतीला अल्टिमेटम देणाऱ्या बच्चू कडूंनी आज अचानक शरद पवारांची भेट घेतली. बच्चू कडू आणि शरद पवार यांची पाऊणतासांहून अधिकवेळ चर्चा झाली. यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, बच्चू कडू शरद पवार भेटीवर मला काही कल्पना नाही. मी त्यावर बोलणार नाही. बच्चू कडू विरोधात बोलतात म्हणजे काय म्हणतात? राणा सारख्यांवर आवर घाला, राणेवर आवर घाला... येणाऱ्या विधानसभेत 160 जागा जिंकेल.. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार साहेबांनी पण हेच सांगितले.
Sushma Andhare on Raj Thackeray :फडणवीसांनी चांगली स्क्रिप्ट दिली पाहिजे, अंधारेंचा खोचक टोला
हे ही वाचा :
मोठी बातमी : शरद पवार, उद्धव ठाकरेंनी माझ्या नादी लागू नये, सुपारी फेकीच्या घटनेनंतर राज ठाकरेंचा इशारा