एक्स्प्लोर

सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे-केसरकरांना SIT कधी बोलवणार? खरातप्रकरणी शिवसेनेच्या दीपक केसरकरांचे उत्तर

सुषमा अंधारेंनी खरातप्रकरणावरुन राज्य सरकारला अनेक सवाल केले आहेत. मात्र, सुषमा अंधारेंचे आरोप हे राजकीय हेतुने प्रेरीत असल्याचं स्पष्टीकरण आमदार दीपक केसरकर यांनी दिलंय. 

सिंधुदुर्ग : राज्यात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok kharat) प्रकरण गाजत असून राजकीय नेत्यांची नावेही समोर येत आहे. तसेच, राजकीय नेत्यांवर आरोपही केले जात आहेत. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत एसआयटी आणि गृहमंत्र्यांना सवाल केले आहेत. महायुतीमधील नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकरांना चौकशीला कधी बोलावणार? असा सवाल त्यांनी केला. अशोक खरातचे समोर आलेला सीडीआर खरा आहे की खोटा आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. जर ते खरे असतील तर दीपक केसरकर (Deepak kesarkar) आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीला कधी बोलावणार? असे त्यांनी म्हटले होते. आता, सुषमा अंधारेंच्या प्रश्नावर केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

अशोक खरातचे समोर आलेला सीडीआर खरा आहे की खोटा आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. जर ते खरे असतील तर दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीला कधी बोलावणार? रुपाली चाकणकर यांना गजाआड कधी करणार? या प्रश्नांचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, असे म्हणत सुषमा अंधारेंनी खरातप्रकरणावरुन राज्य सरकारला अनेक सवाल केले आहेत. मात्र, सुषमा अंधारेंचे आरोप हे राजकीय हेतुने प्रेरीत असल्याचं स्पष्टीकरण आमदार दीपक केसरकर यांनी दिलंय. 

अशोक खरात प्रकरण आणि सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपासंदर्भात एस.आय.टी. आणि ईडी दोन्ही चौकशा चालू आहेत. कुठं चुकून जरी नाव मिळालं, तरी त्या व्यक्तीला बोलवलं जातं. शेवटी कोणाला भेटणं किंवा कोणाबरोबर फोटो असणं, हा काही गुन्हा होऊ शकत नाही. त्यामुळे केवळ प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण देणं हे योग्य नाही, असे दीपक केसरकर यांनी सुषमा अंधारेंच्या आरोपावर म्हटले. एसआयटी आणि ईडीला त्याचं काम करू द्या. जिथे जिथे त्यांना कोणाची नोंद मिळते, त्यावेळी त्यांनी चांगल्या-चांगल्या लोकांना बोलवलेलं आहे. त्यामुळे माहिती घेण्यामध्ये काहीच चुकीचं नाही. माझा काही संबंध नसताना विनाकारण आमची नावं घेणं, केवळ आमची ओळख आहे म्हणून, आरोप करणे हे अत्यंत चुकीचं आहे, असेही केसरकर यांनी म्हटले. 

सुषमा अंधारेंच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कुठलंही बंधन हे माझ्यावर नाही. त्या एक राजकीय व्यक्ती आहेत, त्यामुळे राजकीयदृष्ट्या आम्हाला बदनाम करण्याचा त्या प्रयत्न करणार. परंतु, त्याची उत्तरं आम्ही दिली पाहिजेत असं बिलकुल नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की, या संदर्भात मी काहीही बोलणार नाही. एसआयटी आणि ईडी त्यांची कारवाई करेल, असे म्हणत सुषमा अंधारे यांचे आरोप राजकीय असल्याचे केसरकर यांनी म्हटले. 

एकनाथ शिंदे बोलावून सूचना देतील

दरम्यान, शिवसेना पक्षात अंतर्गत खदखद असल्याबाबत त्यांना विचारणा केली असता, हे जे प्रश्न आहेत, ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. कुठेही जर काही चूक झालेली असेल, एखाद्या मंत्र्याकडून चूक झालेली असेल, तर त्यांना बोलवून योग्य त्या सूचना एकनाथ शिंदे देतील. त्यामुळे पक्षामध्ये ही नाराजी पुढच्या काळात राहणार नाही, असे स्पष्टीकरण दीपक केसरकर यांनी दिले.

आदित्य ठाकरेंना शुभेच्छा

ठाकरेंच्या शिवसेना पक्षात आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष बनवणे हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे, त्यांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. तरुण नेतृत्व आहे, चांगल काम त्यांच्या हातून घडावं, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंच्या कार्याध्यक्षपदासंदर्भाने होत असलेल्या चर्चेबाबत दिली.

हेही वाचा

परतवाड्याप्रमाणे अशोक खरातच्या फार्म हाऊसवर, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? आदिती तटकरे शांत का? सुषमा अंधारेंचा प्रश्नांचा वर्षाव

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Embed widget