Suresh Dhas : सुरेश धसांनी विनंती करताच देवेंद्र फडणवीसांचा उज्ज्वल निकम यांना फोन, पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
Suresh Dhas on Devendra Fadnavis, Mumbai : देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पुन्हा एकदा भाष्य केलंय.
Suresh Dhas on Devendra Fadnavis, Mumbai : "मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकिल म्हणून निवड करावी, अशी विनंती मी केली आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी अगोदर कोल्हे यांची निवड केली आहे. त्यांनी आता सहाय्य करावं अशी ऑर्डर करण्याची विनंती केली. त्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी उज्ज्वल निकम यांना फोन केला. कारण कोणत्याही प्रकरणामध्ये संबंधित वकिलांची संमती घेतल्याशिवाय सरकारी वकिल म्हणून नेमणूक करता येत नाही. माननिय उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) हे आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी बोलतो म्हणाले", असं भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas ) यांनी सांगितलं. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
सुरेश धस म्हणाले, उज्ज्वल निकम सरकारी वकिल होतील, अशी आशा आहे. एसआयटी पथक जे नेमलेलं आहे. त्यातील 2-4 कर्मचाऱ्यांबाबत आणि बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुकांबाबत आक्षेप असल्याचे मी त्यांना सांगितले. त्यानंतर फडणवीस यांनी याबाबत कारवाई करण्याचा शब्द दिला आहे. विजय वडेट्टीवार साहेब हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, ते मोठे नेते आहेत. ते काही बोलले म्हणून मी त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही. त्याबाबत वडेट्टीवार साहेबांनाच आपण बोलावं असं माझं मत आहे.
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा विषय नाही. हे आका मोठ्या आकांसोबत सगळीकडे होते. त्यामुळे तिच गाडी सरेंडरसाठी होती, तिच गाडी भेटीसाठीही होती. हे लोक बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नयेत. ते संभाजीनगरमध्ये ठेवावेत. बिंदू नामवलीत वेगवेगळ्या प्रवर्गातील लोकं आलेत. एकाच प्रवर्गाचे लोक जास्त संख्येने आल्याने प्रॉब्लेम होऊ शकतो. मी आता यांना हलवा म्हणतोय. भविष्यात ही केसचं दुसरीकडे हलवा असं म्हणेन. मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही. त्यांचा राजीनामा मागण्याचा प्रश्न येत नाही. ज्या सरकारी वकिलांनी बाजू मांडण्यास नकार दिलाय, त्याचं पद काढून घ्यावं, अशा आशयाच पत्र मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या