(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Video : बिग बॉसने तुला कसं बोलवलं?; अजित पवारांचे बरेच प्रश्न, सूरजचं उत्तर ऐकून दादा पोट धरुन हसले
अजित पवारांची भेट सूरजसाठी स्वप्नपूर्तीची ठरली असून सूरजच्या घराचं स्वप्न पूर्ण झालंय. कारण, अजित पवारांनी सूरजला मोठं घर बांधून देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
पुणे : बिग बॉस मराठीचा यंदाच्या सिझनमधील विजेता सूरज चव्हाण याने उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार (Ajit pawar) यांची भेट घेतली. अजित पवारांच्या पुण्यातील घरी जाऊन सूरजने अजित पवारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, तसेच बिग बॉसची ट्रॉफीही सूरजने अजित पवारांच्या हाती घेतली होती. अजित पवारांनी सूरज चव्हाणला (Suraj chavan) अनेक प्रश्न विचारली, घरापासून ते बारामतीपर्यंत आणि रिल्सपासून ते बिग बॉसपर्यंत अजित पवारांनी सूरजसोबत चर्चा केली. तसेच, बिग बॉसमध्ये तुला कसं बोलवलं?, असा सवालही अजित पवारांनी सूरजला केला होता. त्यावर, सूरजने दिलेल्या उत्तराने अजित पवारांनाही हसू आवरेना. सूरजचं बोबडं बोलंण आणि त्याच्या स्टाईलने अजित पवारांसह उपस्थित पोट धरुन हसू लागले. विशेष म्हणजे आजच्या भेटीत सूरजच्या मोंढवे गावातील घराबाबतही अजित पवारांनी प्रश्न विचारले अन् सूरजला मोठं घर बांधून द्या अशा सूचनाही फोनवरुन संबंधितांना केल्या आहेत.
अजित पवारांची भेट सूरजसाठी स्वप्नपूर्तीची ठरली असून सूरजच्या घराचं स्वप्न पूर्ण झालंय. कारण, अजित पवारांनी सूरजला मोठं घर बांधून देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. सूरजने अजित पवारांना बिग बॉसच्या घरातील काही किस्से देखील सांगितले. त्यावेळी त्याच्या बोलण्यावरुन अजित पवारांना हसू आवरत नव्हतं. सूरजने अजित पवारांना सांगितलं की, दादा ट्रॉफी बारामतीमध्ये आणायची हे मी आधीच ठरवलं होतं. मला बिग बॉसनेही खूप सपोर्ट केला. मी जे बोलतो ते करुन दाखवतोच. अजितदादांनी बिग बॉसची ट्रॉफी हातात घेतली, सुरज चव्हाणला विचारलं रिल्स कसे करतो?, तुला बिग बॉस मधे कसं बोलवलं?, त्यावर रील्स बघून बोलवलं, मला बिग बॉसचा कॉल आला तेव्हा खरं वाटत नव्हता. पण मग खरं वाटलं आणि गेलो, असा किस्साही त्याने सांगितला.
अजितदादांकडून सूरजला घर गिफ्ट
त्याचं घर लहान आहे... त्याला गावात घर बांधून द्या अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. बिग बॉसच्या घरातच सूरजच्या घराची बरीच चर्चा झाली. इतकच नव्हे बिग बॉसमधील स्पर्धक अंकिता वालावलकर हिनेही त्याला घर देण्याचं सांगितलं होतं. पण आता थेट उपमुख्यमंत्र्यांची सूरजला घर गिफ्ट केलं आहे.
रिलचे पैसे मिळतात का?
सूरज हा त्याच्या रिलमुळे जास्त फेमस झाला. तसेच बिग बॉसमध्येही त्याची एन्ट्री ही रिलमुळेच झाली. त्यावर अजित पवारांनी त्याला विचारलं की, बिग बॉस मधे कसं बोलवलं? तेव्हा सूरजने सांगितलं की, रिल बघून मला बिग बॉसमध्ये बोलावलं. मला बिग बॉसचा कॉल आला तेव्हा खरं वाटत नव्हता. पण मग खरं वाटलं आणि गेलो. त्यानंतर रिलचे पैसे मिळतात का? त्यावर सूरजने म्हटलं की, नाही रिलचे पैसे मिळत नाहीत, आता पिक्चर येतोय माझा... असे सूरजने अजित पवारांशी बोलताना म्हटले.
हेही वाचा
अगं बया बया बया... मैदान फुल्ल, चारही मार्ग लॉक, बीडजवळ रस्ते जाम; जरांगेंच्या भाषणाची 'अशी' सुरुवात