एक्स्प्लोर

Supriya Sule: कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का?; सजंय राऊतांच्या स्वबळाच्या भूमिकेनंतर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत

Supriya Sule on Shivsena UBT: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे.

Shivsena UBT: आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. यावरती बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

बारामतीत बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, 'महानगरपालिकेची निवडणूक आम्ही आधी एकत्र असतानाही वेगवेगळीच लढत होतो. मागची वेळी वेगळेवेगळे लढलो होतो, त्याच्यामध्ये नवीन काय आहे. त्यामुळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. सगळीच जर इलेक्शन्स आपल्या सोयीने लढायला लागले तर कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का? त्यांना कधी नाय मिळणार? हे त्यांचंही इलेक्शन आहे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बारामती बोलताना म्हटलं आहे. 

त्यांना थांबवणारे आम्ही कोण- जितेंद्र आव्हाड

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एबीपीशी बोलताना म्हणाले, 'त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण. पण आपण एकत्रित विधानसभेत झालेल्या पराभवानंतर आपण एकत्रित राहायला पाहिजे होतं, असं माझं तरी मत आहे. त्याच्यामुळे हा निर्णय फार घाईने घेतलेला दिसतोय. ग्राउंड वरती कार्यकर्त्यांचे मत काय आहे, हे आम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळे हा निर्णय योग्य आहे असं मला वाटत नाही. ठीक आहे, त्यांचा पक्ष आहे. त्यांनी निर्णय घ्यावा. शेवटी बळच कोणालातरी सोबत घेऊन जाणे, हे आम्हालाही पटणार नाही किंवा शोभणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. 

त्याचा फटका 100% तिन्ही पक्षांना बसेल

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून बोलले आहेत का? त्यावर सहमतीने कधी निर्णय झालाय का? या संदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले,  नाही. या संदर्भातला निर्णय तर झालेला नाहीये. आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही या राऊत यांच्या वक्तव्यावर आव्हाड म्हणाले, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळते असं नाही. आमच्याही पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, शेवटी मत विभागणीचा फटका कसा बसतो हा आपण लोकसभेला विधानसभेला अनुभवलेला आहे, जवळजवळ 45 सीट मत विभागणीमुळे आपल्या गेलेले आहेत, हे जर विसरून आपण असं राजकीय पाऊल टाकणार असेल तर त्यांच्यावर टीका करण्याचा काही पॉईंट नाही, पण त्यांचा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा असे त्यांनी पुढे म्हटले. जर वेगवेगळे लढले तर त्याचा फटका 100% तिन्ही पक्षांना बसेल अशी शक्यता, जितेंद्र आव्हाड यांनी वर्तवली आहे.

नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले की, नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहे. एकदा आम्हाला पाहायचे आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी घोषणा त्यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या घोषणेनंतर आता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHAShivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणाTorres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Embed widget