एक्स्प्लोर

Supriya Sule: सरकारच्या निर्णयाचं स्वागत पण...'सुप्रिया सुळेंनी सरकारला फटकारलं, भ्रष्टाचारी नसाल तर सिलेक्टीव्ह वॉशिंगमशीन चालणार नाही..

सरकारने काहीतरी निर्णय घेतला याचं मी स्वागत करेल. पण सातवा आरोपी जो खुनी आहे तो गायब आहे. एक माणूस राज्यात गेले 72 दिवस आपल्याला सापडत नाही याच्यावर माझा विश्वास नाही असेही त्या म्हणाल्या.

Supriya Sule: सरकारने काहीतरी निर्णय घेतला याचं स्वागत आहे .पण सातवा आरोपी जो खुनी आहे तोच गायब आहे .जगात एवढं तंत्रज्ञान असताना कृष्णा आंधळे नावाचा खुनी फरार आहे .एक माणूस राज्यात गेले 72 दिवस आपल्याला सापडत नाही यावर माझा विश्वास नाही . एक निर्णय ओएसडी ना आणि एक निर्णय मंत्र्यांना हा कुठला न्याय?असा सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे .छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या बोलत होत्या . (Supriya Sule)

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 72 दिवस उलटल्यानंतर या प्रकरणात सरकारी वकील म्हणून महाराष्ट्र सरकारने जेष्ठविधीज्ञ उज्वल निकम (Ujwal Nikam) यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली .कृष्णा आंधळेला पकडून अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत आहेत .दरम्यान या प्रकरणात विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत . (santosh Deshmukh Case)

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

सरकारने काहीतरी निर्णय घेतला याचं मी स्वागत करेल. पण सातवा आरोपी जो खुनी आहे तो गायब आहे. एक माणूस राज्यात गेले 72 दिवस आपल्याला सापडत नाही याच्यावर माझा विश्वास नाही .अनेक वेळा मी मुख्यमंत्री एस पी पोलीस यंत्रणेला मी संपर्क केला. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अमित शहा यांची दोनदा भेट घेतली, आम्हालाही सहकार्य करायची पूर्ण तयारी आहे. आम्हाला याच्यात कोणतेही राजकारण आणायचं नाही . बीड मधील दोन कुटुंब आणि परभणीतील एक कुटुंब या तिन्ही कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली .

सातवा माणूस गायब आहे तरी कुठे या जगामध्ये एवढं तंत्रज्ञान असताना कृष्णा नावाचा खुनी फरार आहे तो सरकारला सापडत नाही यावर माझा विश्वास बसत नाही. संदीप क्षीरसागर गेली महिनाभर म्हणत आहेत, आरोपी सापडत नाही असं कसं झालं याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे.. देशमुख आणि मुंडे कुटुंब या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून त्या कुटुंबाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे . परभणीचे इन्क्वायरी कुठपर्यंत गेली आहे हेही सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजे. महाराष्ट्र सरकार पारदर्शकपणे का काम करत नाही.असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सरकारला फटकारले .

तुमचं सरकार भ्रष्टाचारमुक्त असेल तर सिलेक्टिव्ह वॉशिंग मशीन चालणार नाही :सुप्रिया सुळे

काल मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला ते काय म्हणाले जे ओएसडी किंवा पी एस वर आरोप झाला असेल त्याला आम्ही ठेवणार नाही, त्याचा मी स्वागत करते, मात्र एक निर्णय ओएसडी ना आणि एक निर्णय मंत्र्यांना हा कुठला न्याय?ओएसडी आणि पीए ठेवताना ज्याच्यावर आरोप झालेल कोणावर केस असेल, त्याला मी मंत्रालयात ठेवणार नाही असं म्हणत आहात, तर मग मंत्र्यांसाठी दुसरा कायदा?असा सवालही सुळे यांनी केला .  तुमचं सरकार खरच भ्रष्टाचारमुक्त असेल तर वाशिंग मशीन सिलेक्टिव्ह चालणार नाही .सुरेश धस यांचे स्टेटमेंट मी ऐकलं होतं आता ते मला खरं वाटतंय,मी एकटी आरोप करत नाही सगळे करत आहेत.. महाराष्ट्रमध्ये अनेक मंत्र्यावरती असे आरोप होत आहेत हे दुर्दैव आहे. ज्यांना दोन वर्षे शिक्षा झाली आहे ती कोर्टाने केली आलेली आहे आम्ही नाही केली. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या .

हेही वाचा:

Santosh Deshmukh Case: देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, संतोष देशमुख हत्याप्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

Embed widget