एक्स्प्लोर

Supriya Sule & Devendra Fadnavis: बिहारच्या निकालाची धामधूम सुरु असतानाच महाराष्ट्रात मोठी घडामोड, सुप्रिया सुळे अचानक वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, कारण काय?

Supriya Sule & Devendra Fadnavis: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरु आहे. बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांची सरशी होताना दिसत आहे.

Supriya Sule & Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर होत आहे. मतमोजणीचे प्राथमिक कल पाहता भाजप आणि जदयू यांच्या एनडीए आघाडीला (NDA) बहुमत मिळण्याची दाट शक्यता आहे. साहजिकच या सगळ्याचा परिणाम राष्ट्रीय राजकारण आणि देशातील आगामी निवडणुकांवर होणार आहे. त्यामुळे अनेकजण बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे बारकाईने डोळे लावून बसले आहे. बिहारमध्ये एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असल्यामुळे संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे. या सगळ्या गदारोळात महाराष्ट्रात एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. (Bihar Election Result 2025)

काहीवेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीला दाखल झाल्या होत्या. सुप्रिया सुळे (Supriya Sule) शुक्रवारी सकाळी अचानक देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर गेल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आता या भेटीमागील कारणही समोर आले आहे. ही भेट राजकीय स्वरुपाची नाही. तर सुप्रिया सुळे या युगेंद्र पवार यांच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका देण्यासाठी वर्षा बंगल्यावर आल्याचे समजते. 

Pune Navale bridge Accident: नवले ब्रीज अपघातानंतर सुप्रिया सुळेंची नितीन गडकरींना विनंती

नवले पूल येथे काल झालेला अपघात अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेत काही नागरीक मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले. यापुर्वीही येथे झालेल्या अपघातात जिवितहानी झाली आहे. हे रोखण्यासाठी नऱ्हे ते रावेत या मंजूर असलेल्या एलिव्हेटेड मार्गासह इतर एलिव्हेटेड मार्गांचे काम तातडीने सुरु करण्याची गरज आहे. यासोबतच रस्ते सुरक्षेबाबत देखील सातत्याने जनजागृती करण्याची तसेच शहरांच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यांचे तातडीने 'सुरक्षा ऑडीट' होण्याची गरज आहे. माझी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन जी गडकरी यांना नम्र विनंती आहे की कृपया आपण नऱ्हे ते रावेत दरम्यानच्या एलिव्हेटेड मार्गाचे काम तातडीने सुरु करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्या. यासह रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मोहिम हाती घ्यावी, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

Bihar Election Result 2025: बिहारमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये सत्ताधारी एनडीए आघाडीवर

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भाजप 83 जागांवर आघाडीवर आहे आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू 79 जागांवर आघाडीवर आहे. तेजस्वी यादव यांच्या आरजेडीने 32 जागांवर आघाडी घेतली आहे आणि चिराग पासवान यांचा एलजेपीआर 22 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि सीएमपीआयएमएल प्रत्येकी सहा जागांवर आघाडीवर आहेत. लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव हे दोघेही पिछाडीवर आहेत.

आणखी वाचा

शरद पवार अन् अदानी सोफ्यावर, मुख्यमंत्री खुर्चीवर; शाही सोहळ्यात दिग्गज एकत्र, व्हायरल फोटो कुणाच्या लग्नातला?

Bihar Election Result 2025 Live Updates: तेजस्वी यादव अन् तेज प्रताप यादव दोघंही पिछाडीवर; बिहारमध्ये पुन्हा मोदी सरकार

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप

व्हिडीओ

PM Narendra Modi On BJP Mumbai Win : मुंबईत भाजपला रेकॉर्डब्रेक जनमत, नरेंद्र मोदींकडून कौतुक
Mumbai bmc election result politics :  शिंदेंनी नगरसेवक का लपवले? महापौर पदासाठी शिंदेंचा अट्टाहास?
Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Daryl Mitchell Ind vs Nz 3rd ODI : कुणालाही न जमलेलं करून दाखवलं! भारताविरुद्ध डॅरिल मिशेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, क्रिकेट विश्व अचंबित
कुणालाही न जमलेलं करून दाखवलं! भारताविरुद्ध डॅरिल मिशेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, क्रिकेट विश्व अचंबित
BJP Leader Raj K purohit passes away: भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
Embed widget