Supriya Sule, सांगली : "आरक्षणाचा प्रश्न निवडणुकीपुरता सीमित नाही. गेल्या 10 वर्षात मी सातत्याने मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाबाबत वारंवार बोलले आहे. कॉम्रेप्रीहेन्सिव्ह बील आणून त्यावर चर्चा घडवून आणली पाहिजे. सरकार जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही राहू. या देशात आरक्षणाची मागणी कोणी केली असेल तर ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. एक कॉम्प्रेहेन्सिव्ह बील आणा. त्या बिलावर 4 ते 5 दिवस चर्चा करु. सर्वांचं एकमत करु. सगळे एकत्र मिळून आपण हा प्रश्न सोडवू. जे सरकार मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्तांना आरक्षण देईल, त्या सरकारला आम्ही पाठिंबा देऊ", असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या सांगलीत पत्रकारांशी बोलत होत्या. 


 सत्य परेशान हो सकता हैं, लेकिन पराजित नहीं


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, सत्य परेशान हो सकता हैं, लेकिन पराजित नहीं हो सकता.  सत्याचाच नेहमी विजय होतो. अरविंदजींना बेल मिळाली त्याबद्दल  आम्ही  खूप खूप आनंदी आहोत, समाधानी आहोत. केजरीवाल यांच्या कुटुंबाने  खूप अन्याय सहन केला आहे. विरोधी पक्षाच्या कुटुंबना खूप त्रास दिला जातोय. मगर लडेंगे और जितेसंगे, असंही सुळे यांनी नमूद केलं. 


आम्ही कोणाचा चेहरा घेऊन आम्ही लढलेलो नाही


मविआचा मुख्यमंत्रि‍पदाबाबत सुळे म्हणाल्या, ते काळाबरोबर कळेल. टीम मॅटर्स, आम्ही कोणाचा चेहरा घेऊन आम्ही लढलेलो नाही. एखादा वडील मुलीला  मारून नदीत फेकून देण्याची भाषा बापाने  करणे ही एक प्रकारची भ्रूणहत्याच आहे. हे किती दुर्दैवी आहे. म्हणून एका बहिणीला वाचवण्यासाठी जाणे हे माझे कर्तव्यच आहे. सुसंकृत महाराष्ट्रात कोणत्या वडिलांना ही भाषा शोभते, असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला आहे.


खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा महायुतीवर टीका केली आहे. पैसे, सत्ता येते जाते, पण टिकतात फक्त नाती, पण काहींना नाती कळली नाहीत. बहिणी लोकसभा निकालानंतर लाडक्या झाल्या. 1500 रुपयांने नाती निर्माण होत नाहीत, पण या नात्यावरून देखील महायुतीत श्रेयवाद होतोय, असंही सुळे यांनी सांगितलं 


इतर महत्वाच्या बातम्या 


Jitendra Awhad : भाजपचा मनमोहन सिंग-सरन्यायाधीशांचा फोटो दाखवून काँग्रेसच्या कोंडीचा प्रयत्न, जितेंद्र आव्हाड मदतीसाठी मैदानात, ट्विट करत म्हणाले...