आईने नवरा बदलला तर बाप बदलत नाही; पण तुम्ही तर आईच बदलून टाकली, विजय करंजकरांवर सुधाकर बडगुजरांचा हल्लाबोल
Sudhakar Badgujar on Vijay Karanjkar, Nashik : ठाकरे गटातून नुकताच शिंदे गटात प्रवेश केलेल्या विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांच्यावर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी जोरदार टीका केली आहे
Sudhakar Badgujar on Vijay Karanjkar, Nashik : ठाकरे गटातून नुकताच शिंदे गटात प्रवेश केलेल्या विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांच्यावर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी जोरदार टीका केली आहे. 'आईने नवरा बदलला तर बाप बदलत नाही; पण तुम्ही तर आईच बदलून टाकली', असे म्हणत सुधाकर बडगुजरांनी जोरदार टीका केली आहे. ते नाशिकमध्ये मविआच्या सभेत बोलत होते.
पडद्यामागे गद्दाराच्या गप्पा, तुमचा घात तुम्ही करून घेतला
सुधाकर बडगुजर म्हणाले, पूर्वीचा उमेदवार दिला असता तर अडचण झाली असती. मध्यवर्ती कार्यालयावर 2 दुकाने घ्यायची ठरवलं होतं. 6 लाख रुपये विजय करंजकर यांना व्हाइट इन्ट्री देण्यासाठी दिले, परत त्यांनी दिले नाहीत. पडद्यामागे गद्दाराच्या गप्पा, विजय करंजकर तुमचा घात तुम्ही करून घेतला. तुमची लायकी नव्हती, आईने नवरा बदलला तर बाप बदलत नाही पण तुम्ही तर आईच बदलून टाकली, असंही बडगुजर म्हणाले.
हेमंत गोडसेंच्या क्लिपबाबत कारवाईचे आदेश का दिले नाहीत?
हेमंत गोडसे उभा असतांना ट्रॅक्टरचा प्रचार केला. ट्रॅक्टरवर माणिक कोकाटे होते. फॉर्म भरतांना चार लोकं माघे घेतांना 1 मीटिंग घेतली हजार लोकांची, निर्णय ठरला होता. शिंदे साहेबांकडे वेटिंगवर होता, आधी मेळावा घेतला तर ताकद समजली असती, वरुण सरदेसाई येणार म्हणून सभा घेत होते. सलीम कुत्ताबाबत गुन्हा दाखल केला. पारू दे पप्पीला गुन्हा दाखल केला असता तर सगळं समोर आलं असतं. बडगुजर यांच्यावर जसे कारवाईचे आदेश दिले तसे हेमंत गोडसेंच्या क्लिपबाबत का दिले नाही? हेमंत गोडसे दुसऱ्या पत्नीशी संबंध ठेवतात, जे व्हाट्सएपला पाठवलं ते विजय करंजकरने मला पाठवलं आणि व्हायरल करा म्हटला, असंही बडगुजर म्हणाले.
आज तुम्हीच त्याच्या बरोबर फिरता, खोक्यांसाठी माघार घेतली, इमूचे प्रकरण समोर येईल. 300 मतांनी निवडून येतो, आणि चालला लोकसभा लढवायला, साकुरची सभा फेल कुणी केली ? फायद्यासाठी गेला तर मोठे व्हा. भगूरला सभा घेऊन त्याच्या (करंजकरच्या) छाताडावर नाचायचे, तिथंच त्याला गाडलं पाहिजे, राजाभाऊ वाजेला लोकसभेला पाठवणार आहे, असंही बडगुजर म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या