Subhash Desai : मी 22 वर्ष आमदार राहिलो, मला 84 हजार पेंशन मिळते; मोदींना किती मिळणार? सुभाष देसाईंनी सगळचं सांगितलं
Subhash Desai : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी त्यांना 84 हजार रुपये पेंशन मिळते, असं सांगितलं आहे.
Subhash Desai, शिर्डी : "पेंशन सर्वांना मिळते. कर्मचाऱ्यांना मिळते एवढचं नाही. लोकप्रतिनीधींनाही पेंशन मिळते. मी 22 वर्ष आमदार होतो. 15 वर्ष आणि 7 वर्ष विधानपरिषदेत आमदार होतो. पहिल्या वेळेला बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला आणि विधानसभेत पाठवलं. त्यानंतर उद्धव साहेबांनी पुन्हा पुन्हा संधी दिली. या 22 वर्षात सेवा केली. लोकप्रतिनिधी करतात ती सेवा आहे, असं सगळेच लोक मानत नाहीत, पण आपण तसं मानुयात. त्यामुळे मला पेंशन चालू झाली. मला 84 हजार रुपये पेंशन मिळते", असं माजी मंत्री सुभाष देसाई म्हणाले. शिर्डीत पेन्शन धारकांच्या महाधिवेशनात ते बोलत होते.
आपले जनसामन्यांचे लाडके प्रधानमंत्री आहेत. त्यांना मे महिन्यात जनतेने घरी बसवण्याची तयारी केली होती. दोन कुबड्या घेऊन ते उभे राहिले, पण घरी बसले असते तर त्यांना 90 हजार रुपये पेंशन मिळाली असती, असंही सुभाष देसाईंनी सांगितलं.
कोणासमोर हात पसरण्याची गरज पडणार नाही
सुभाष देसाई म्हणाले, पेन्शन हा प्रत्येकाचा अधिकार आहे. प्रत्येक सरकारी कर्मचारी पूर्ण आयुष्य सेवेत घालवतो. रिटायरमेंट नंतर कुटुंबावर कोणापुढे हात पसरण्याची वेळ येवू नये अशी भावना असते. लोकप्रतिनीधींना देखील पेन्शन मिळते ना ? मी 22 वर्ष मी लोकप्रतिनीधी होतो. मला 84 हजार पेन्शन मिळते. कोणासमोर हात पसरण्याची गरज पडणार नाही. मिळण्याची हमी शासनाने दिली. सर्व आमदार , खासदार , मंत्री सर्वांनाच पेंशन मिळते.
मिंधे , देवाभाऊ आणि दादा घरी बसणार आहेत
रिक्षाचे तीन चाके त्यातले मिंधे , देवाभाऊ आणि दादा घरी बसणार आहेत. त्यांना 90 हजार पेन्शन मिळणार आहे. लाडक्या पंतप्रधानांना मागे मे महिन्यात जनता घरी बसवणार होती. ते आज जरी पदावर नसले 90 हजार रुपये मिळणार आहेत. मग कर्मचा-यांना का नको ? असा सवालही सुभाष देसाई यांनी केला आहे.
आपलं सरकार आल तर तुमची मागणी मी मान्य करतो
उद्धव ठाकरे म्हणाले, फोडाफोडीचे राजकारण सत्ताधारी करणारच आहेत. यांना टेन्शन दिले पाहिजे. आधीच उपाशी आहात, त्यामुळे उपोषण करू नका. यांना सत्तेशिवाय उपोषणावर पाठवा एवढं काम करा. मिंधे आणि चमचे माझ भाषण बघतात. आपलं सरकार आल तर तुमची मागणी मी मान्य करतो. मी वचन दिल्यावर यांना घाम फुटेल व कदाचित कॅबिनेट घेऊन घोषणा सुधा करतील. मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडत नाहीत. माझा महाराष्ट्र म्हणजे तुम्ही हडा मासाची माणसं आहेत. माझी सत्ता तुम्ही सगळे आहात. ती कधीच कोणी घेऊ शकत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
मनसेचा दणका, जोशी वडेवाल्याचं शटर डाऊन; व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनाही दिले निवेदन