एक्स्प्लोर

सलग तीन वेळा आमदार आणि आता लोकसभेच्या रिंगणात; प्रणिती शिंदेना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर, भाजपचं अद्याप काही ठरेना

आमदार प्रणिती शिंदे ह्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून (Solapur Central Assembly Constituency) काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत. सलग तीन वेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे.

Solapur Lok Sabha Elections 2024 : सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency) आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना काँग्रेसकडून (Congress) लोकसभेची (Lok Sabha Election 2024) उमेदवारी जाहीर झाली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी आधीपासूनच निश्चित मानली जात होती. त्यामुळे त्यांनी देखील अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर होण्याआधीच सोलापूर लोकसभा मतदारसंघात दौरे करून प्रचाराला सुरुवात केलेली होती. मात्र, आता त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.

आमदार प्रणिती शिंदे ह्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून (Solapur Central Assembly Constituency) काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत. सलग तीन वेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे. जाई-जुई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिंदे यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात केली. 2009 साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर सोलापूर मध्य या जागेवरून विधानसभा निवडणूक लढवली. तत्कालीन आमदार आणि माकपचे मातब्बर नेते कॉम्रेड नरसय्या आडम यांचा पराभव करून प्रणिती शिंदे ह्या विधानसभेत पोहोचल्या.

त्यानंतर 2014 च्या मोदी लाटेत राज्यसह देशभरात काँग्रेसच्या अनेक दिग्गजाना परभवाला सामोरे जावे लागले. मात्र त्या परिस्थिती देखील प्रणिती शिंदे ह्या विजयी झाल्या. 2019 मध्ये देखील प्रणिती शिंदेनी विजयी होत आमदारकीची हॅट्रिक केली. काँग्रेसने देखील त्यांच्या या विजयानंतर पक्षात मोठे स्थान दिले आहे. सध्या त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यसमितीच्या सदस्य आहेत तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत.

प्रणिती शिंदेंना काँग्रेसकडून उमेदवारी 

सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदेना यंदा काँग्रेसने लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रणिती शिंदेनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. दुसरीकडे मागील दोन लोकसभा निवडणुकात विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अद्याप ही घोषित झालेला नाही. मागील दोन निवडणुकात मिळालेल्या यशानंतर भाजप हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसतर्फे प्रणिती शिंदेना उमेदवारी दिल्याने भाजप ही तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे.

विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीच्या दाखल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने भाजप उमेदवार बदलण्याच्या विचारत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपमध्ये अनेक जण सध्या खासदारकीसाठी इच्छुक आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असताना देखील भाजपकडून खंडीभर इच्छुक आहेत. विद्यमान खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, माळशिरसचे आ. राम सातपुते, पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे, माजी खा. शरद बनसोडे, माजी खा. अमर साबळे, माजी नगरसेविका संगीता जाधव, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्यासह अनेक जणांची सध्या सोलापुरात आहे.

खूपजण इच्छुक असूनही अद्यापपर्यंत भाजपने उमेदवार जाहीर केलेला नाही. यामागे भाजपची काही रणनीती असू शकते, अशी चर्चा आहे. कदाचित भाजप ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर एकदम नवेकोरे नाव जाहीर करू शकेल असे देखील बोलले जातं आहे. जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपामध्येच वादाला तोंड फुटले आहे. तसा वाद सोलापुरात होऊ नये यासाठी उमेदवाराची अद्याप घोषणा झाली नसल्याचे बोलले जातं आहे. दरम्यान भाजपाचे पदाधिकाऱ्यांनी थेट प्रचाराला अद्याप सुरुवात केलेली नसली तरी संघटनात्मक कामाला बऱ्याच दिवसाआधीपासून सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदी हेच उमेदवार म्हणत भाजपने विजयाचा संकल्प केलाय. महाविकास आघाडीने प्रणिती शिंदेना उमेदवारी दिल्याने त्यांच्या विरोधात भाजप कोणाला लोकसभेच्या रिंगणात उतरवेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget