पुणे : महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाची जनता ओळखत असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नुकतंच पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमधे भरती करण्यात आलं आहे. त्यांना ह्रदयासंबधी समस्येमुळे रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर एंजीओग्राफीसह आणखी काही तपासण्या करण्यात आल्या असून यावेळी त्याच्या ह्रदयात छोटे ब्लॉकेज आढळून आले आहेत. सुदैवाने अण्णांवर शस्त्रक्रियेची गरज नसून औषधांनी हे ब्लॉकेज ठिक करण्यात येणार असल्याच रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉकटर परवेझ ग्रांट यांनी सांगितलं आहे.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडूनही चौकशी


अण्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. तसंच ते लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा ही व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री सद्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावरही फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यावर त्यांनी आठवणीने विचारपूस केली आहे.



महत्त्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha