मुंबई :  राज्य शासनाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे.  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर  शिक्कामोर्तब झाले असून  22 ते 28 डिसेंबर या कालावधीत अधिवेशन प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर  (CM Uddhav Thackeray) शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते अजूनही रुग्णालयातच उपचार घेत आहेत. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला ते ऑनलाईन उपस्थित होते. 


सोमवारी अधिवेशनास संदर्भात BAC (Business Advisory Committee) ची बैठक होणार आहे. त्यात अधिवेशनाची तारीख अंतिम केली जाईल. अधिवेशन मुंबईतच होणार आहे. 22 ते 28 डिसेंबरपर्यंत अधिवेशन होणार आहे. गेल्या वर्षी देखील नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात आलं होतं. नागपूर करारानुसार वर्षातून एक तरी अधिवेशन नागपुरात घेणे बंधनकारक आहे.  अधिवेशन मुंबईत घेतल्यास विरोधक सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, हिवाळी अधिवेशन कुठे आणि कधी घ्यायचं याबाबतही आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अपेक्षित होता. . मुख्यमंत्र्यांची प्रकृती आणि अन्य कारणं देत शिवसेना अधिवेशन मुंबईत करण्यासाठी आग्रही  होती.  तर काँग्रेस मात्र नागपूरमध्ये अधिवेशन व्हावं यासाठी आग्रही असल्याची माहिती समोर आली.


जुलैमध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता होताना हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथे होईल, असे घोषित करण्यात आले होते. मात्र, नियोजित अधिवेशनाला 15 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अद्याप मंत्रालय पातळीवर अधिवेशनाच्या तयारीची हालचाल नाही. अधिवेशनाच्या महिनाभर आधी कामकाज सल्लागार समितीची बैठक होते. अधिवेशनाला जेमतेम 15 दिवस शिल्लक असताना सल्लागार समितीच्या बैठकीचा पत्ता नाही. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंना डिस्चार्ज अद्याप मिळालेलं नाही.त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख मंत्र्यांनी हे अधिवेशन मुंबईत घ्याव असं एकमताने ठरवलं आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



 


संबंधित बातम्या :


Winter Session : मोजके अपवाद वगळून खाजगी क्रिप्टोकरन्सीवर भारतात बंदी? संसदेच्या आगामी अधिवेशनात 26 विधेयकं पटलावर


Parliament Winter Session:संसदेचं हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता