एक्स्प्लोर

Sindhudurg News : 26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचं कात्रण जपून ठेवलं, संजय राऊतांना पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी रस्ता मोकळा करतोय : नारायण राणे 

Sindhudurg News : 26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचं कात्रण जपून ठेवलं आहे. संजय राऊतला सोडणार नाही. ती त्याच्यावर केस करणार आहे, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे.

Sindhudurg News : "26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचं (Saamana Editorial) कात्रण जपून ठेवलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) याला पुन्हा जेलचा (Jail) रस्ता दाखवणार. 100 दिवस जेलमध्ये जाऊन बाहेर आलाय ना. त्याला पुन्हा जेलवारी घडवणार," असा इशारा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी सिंधुदुर्गातील (Sindhudurg) कणकवलीमधील एका कार्यक्रम दरम्यान दिला आहे. कणकवली पर्यटन महोत्सव 2023 मध्ये (Kankavali Tourism Festival 2023) नारायण राणे बोलत होते.

संजय राऊतला सोडणार नाही : नारायण राणे

"माझ्याकडे कात्रण आहे, मी वकिलाकडे पाठवून ठेवलंय. मी असं वाचून विसरणारा नाही, दखल घेणारा आहे. वाईट स्वभाव आहे माझा. 26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचं कात्रण जपून ठेवलं आहे. संजय राऊतला सोडणार नाही. ती त्याच्यावर केस करणार आहे. 100 दिवस कमी वाटले म्हणून त्याला वाटलं परत जावं. म्हणून रस्ता मोकळा करतोय परत जायला," असं नारायण राणे म्हणाले. 

26 डिसेंबरच्या सामनातील अग्रलेखात काय लिहिलं होतं?

ठग-पेंढाऱ्यांचे राज्य! या मथळ्याखाली 26 डिसेंबरचा अग्रलेख प्रकाशित झाला होता. यात नारायण राणेंचा उल्लेख न करता म्हटलं होतं की, "सिंधुदुर्गात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात. या तिन्ही खुनांच्या तपासासाठी श्री. फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील तर कोकणातले 100 सांगाडे पुरावे म्हणून त्या एसआयटीसमोर स्वत:च हजर होती. पण श्रीमान फडणवीस ते करणार नाहीत. ढेकणासंगे हिराही भंगला अशी त्यांची गत झालेली दिसते."

संजय राऊत 102 दिवस तुरुंगात

मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणाच्या आरोपांप्रकरणी ईडीने खासदार संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी विशेषे पीएमएलए कोर्टाने दिलासा देत त्यांना जामीन मंजूर केला. संजय राऊत तब्बल 102 दिवस तुरुंगात होते. जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत यांची मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. विशेष पीएलए कोर्टाने आपल्या जामीन ऑर्डरमध्ये ईडीबद्दल मोठे खुलासे केले होते. संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर होती, असं कोर्टाने आपल्या ऑर्डरमध्ये स्पष्ट म्हटलं होतं.

VIDEO : Narayan Rane On Sanjay Raut : 'संजय राऊतांना पुन्हा तुरूंगाचा रस्ता दाखवणार' , नारायण राणेंचा इशारा

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah :  जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केला जसप्रीत बुमराहचा अनोखा सन्मान, यशस्वी जयस्वालला देखील मानाचं स्थान
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Kambli Plays Cricket : भारताची जर्सी, हातात क्रिकेट बॅट; हॉस्पिटलमध्ये कांबळीचे चौकार-षटकार!Vinod Kambli Discharged : भारताची जर्सी, डोळ्यावर गॉगल आणि हाती बॅट; विनोद कांबळीला डिस्चार्ज!Jitendra Awhad on Beed Crime : बीड प्रकरणातील आका म्हणजे मुंडे! जितेंद्र आव्हाड आता स्पष्टच बोललेLai Bhari Award 2024 : सुपर डुपर डान्स ते खतरनाक शायरी : लय भारी पुरस्कार 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah :  जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केला जसप्रीत बुमराहचा अनोखा सन्मान, यशस्वी जयस्वालला देखील मानाचं स्थान
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
Milind Narvekar : अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
Gold Rate : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
Embed widget