एक्स्प्लोर

मोठी बातमी : अमित ठाकरे भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची शक्यता, राज-फडणवीस भेटीत काय काय ठरलं?

Amit Thackeray : अमित ठाकरे यांना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे.

मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे भेटीसाठी दाखल झाले आहेत. या भेटीसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे. भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. या शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसे आणि भाजप युती होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण 12 जागांपैकी 5 जागा रिक्त आहेत. 

भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अमित ठाकरेंना घेतलं जाण्याची शक्यता आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप मनसेची साथ घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं भाजप काही जागा मनसेला सोडू शकतं, अशी माहिती आहे.  अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर आमदार करुन भाजप आणि मनसेच्या मैत्रीचा नवा अंक सुरु होणार का ते पाहावं लागेल. 

अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक माहीम विधानसभा मतदारसंघातून लढवली होती. माहीममध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. माहीमची निवडणूक तिरंगी झाली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांनी सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांचा पराभव केला होता. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर पहिलीच भेट होती.  मुख्यमंत्री सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट ॲंड गाईड हाॅलमधील शिवाजी पार्कमध्ये परीक्षा पे चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वीच्या भेटीमुळं राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यपाल नामनिर्देशित कोट्यातून सध्या भाजपच्या चित्रा वाघ, विक्रांत पाटील, बाबूसिंग महाराज राठोड, शिवसेनेचे हेमंत पाटील, मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ, इद्रिस नायकवडी विधानपरिषदेवर आमदार आहेत.  12 पैकी 5 जागा रिक्त असून या जागेवर महायुती कुणाला संधी देतं ते पाहावं लागेल. 

स्थानिक स्वराज संस्थांमध्ये भाजप मनसे युती? 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसे आणि भाजप यांच्यात युती देखील होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज सव्वा तास बैठक पार पडली. या बैठकीतून भाजप मनसेच्या नव्या मैत्रीचं पर्व सुरु होणार का ते पाहावं लागेल.

इतर बातम्या : 

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला; शिवतीर्थावरील भेटीने चर्चेला उधाण

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget