एक्स्प्लोर

आमच्या कुंडल्या काढायचं म्हणता, आम्ही संदुक उघडू तेव्हा पळता भूई थोडी होईल; संजय राऊतांचा राणेंवर पलटवार

काहीजण जनआशीर्वाद यात्रा काढतात तर काही येड्याची जत्रा काढतात असा टोला लावत संजय राऊत म्हणाले की, वारंवार घसरल्यानंतर एकदा कायद्यानं लगाम घालणं गरजेचं, होतं, तो लगाम मुख्यमंत्र्यांनी घातला.

नाशिक : आज तुम्ही आमच्या कुंडल्या काढायचं म्हणताय, आम्ही संदुक उघडू तेव्हा तुमची पळता भुई थोडी होईल असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दिला आहे. मंत्र्यांची भाषा सभ्य असावी, त्यांनी असभ्य भाषा वापरू नये. पण वारंवार घसरल्यानंतर एकदा कायद्यानं लगाम घालणं गरजेचं होतं, तो लगाम मुख्यमंत्र्यांनी घातला असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. ते नाशिकमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधत होते.  

खासदार संजय राऊत म्हणाले की, "देशात गेल्या आठ दिवसापासून नाशिकच नाव गाजतंय. नारायण राणेंवर गुन्हा दाखल झाला तेव्हा मी भुवनेश्वर ला होतो. नाशिक देवभूमी आहे, भुवनेश्वरही देवभूमी. दुसऱ्या दिवशी नाशिकने देशात वादळ उठवलं आणि आजही ते सुरू आहे. आता कानफडात वाजवण्याची भीती वाटते."

काहीजण जनआशीर्वाद यात्रा काढतात तर काही येड्याची जत्रा काढतात असं सांगत खासदार संजय राऊत म्हणाले की, "केंद्रीय मंत्री भारती पवार, भागवत कराड आणि कपिल पाटील यांनीही शांतपणे जनआशीर्वाद यात्रा काढली. देशातील 36 मंत्र्यांनीही शहाण्याप्रमाणे यात्रा काढली. पण एक अतिशहाणा आहे, ज्यांने केंद्र सरकार, मोदी यांच्या कामाचा प्रचार केला नाही. 

नारायण राणे आणि सध्या ते ज्या पक्षात आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करावे असं सांगत खासदार संजय राऊत म्हणाले की, "राणे जेव्हा पासून भाजपात गेले तेव्हापासून भाजप रोज दहा फूट मागे जातोय. एक दिवस असा येईल की भाजप अर्ध्या फुटावर जाणार. नारायण राणेंचा भाजपला मोठा फटका बसणार." 

खासदार संजय राऊत म्हणाले की, "आम्ही कधी शाळा कॉलेजमध्ये पहिले आलो नाही पण जे पाच मुख्यमंत्री देशात टॉपला आहेत, त्यात एकही भाजपचा मुख्यमंत्री नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या टॉप पाचमध्ये आहेत. गुन्हा दाखल करण्याचे हिमतीचे काम नाशिकमध्येच होईल याची खात्री होती, नाशिक भविष्यात दिशादर्शक ठरेल असंही."

... तर आमच्याकडे बरेच खांदे
संजय राऊत म्हणाले की, "फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड काय चर्चा झाली हे सर्वांनाच माहिती आहे. भाजपशी आमचे वैचारिक मतभेद आहेत. राणे यांना आम्ही भाजपचे मनात नाही. भाजप शिवसेनेवर टीका करण्यासाठी कोणाचा खांदा वापरत असेल तर आमच्याकडे अनेक खांदे आहेत. एखाद्याला राजकारणातून उठविण्यासाठी त्याचा वापर करु." 

आपण सत्तेत आहोत, म्हणून आपण आता सभ्य झालोय असं सांगत महाराष्ट्रात दीर्घकाळ शिवसेनेचा मुख्यमंत्री राहणार असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. काही लोक म्हणतात सरकार पडणार आहे, तो काय आंबा आहे का असाही सवाल त्यांनी केला. 

महत्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget