एक्स्प्लोर

महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार, आवर घालण्याची गरज; अनिकेत तटकरेंची जहरी टीका महायुतीत भडका

शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी हे डोक्यावर पडलेले आमदार आहेत. याशिवाय ते स्वतःला चिटर आमदार असं म्हणणारे असून दुसऱ्यालाही त्याच नजरेने पाहतात.

रायगड : जिल्ह्यातील (Raigad) महायुतीमध्ये सातत्यान होत असलेल्या वादाचा भडका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Election) उडताना दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil tatkare) यांच्यात आरोप-प्रत्यारोप आणि टीका टिपण्णी होत आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही मतभेद बाजूला ठेवून सुनील तटकरेंना दिल्लीला पाठवलं, पण त्यांनी आम्हाला फसवलं, असा हल्लाबोल महेंद्र दळवींनी काही दिवसांपूर्वी केला होता. आता, अनिकेत तटकरे यांनी महेंद्र दळवी हे डोक्यावर पडलेले आमदार आहेत, असे म्हणत पलटवार केला आहे. त्यामुळे, महायुतीमध्ये निवडणुकांपूर्वीच भडका उडालाय.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी हे डोक्यावर पडलेले आमदार आहेत. याशिवाय ते स्वतःला चिटर आमदार असं म्हणणारे असून दुसऱ्यालाही त्याच नजरेने पाहतात, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी केली. शिवसेना शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार शाब्दीक प्रहार केला होता. त्यानंतर, या टीकेला उत्तर देत अनिकेत तटकरे यांनी आमदार दळवी यांच्यावर बोचरी टीका केली. पार्थ पवार आणि धनंजय मुंडे यांचा घात राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी केला, असा दावा महेंद्र दळवींनी केला होता, या टीकेला अनिकेत तटकरेंनी प्रत्त्युत्तर दिलंय.

आमदार महेंद्र दळवी हे आमच्या नेत्यांवर बेताल वक्तव्य करत असून त्यांच्या या बेताल वक्तव्याला आवर घालण्यासाठी आम्ही त्यांचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार आहोत. याशिवाय महेंद्र दळवी हे स्वतःला मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे समजत आहेत, आता त्यांना आवरण्याची गरज आहे, असेही तटकरे यांनी म्हटले. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी काल रोह्यात शिवसेना पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाला उत्तर देत अनिकेत तटकरे यांनी आमदार दळवी यांना टोला लगावला, तसेच आगामी निवडणुकीत सर्व जागा आम्ही जिंकू, असा दावाही त्यांनी केलाय.

महेंद्र दळवींचा पलटवार

दरम्यान, घोडा मैदान आता जास्त लांब नाही, त्यामुळे येथे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असा पलटवार महेंद्र दळवींना केलाय. दुसरीकडे मुख्यालयात आमदार असणाऱ्यांना त्यांच्याच होम ग्राउंडवर उमेदवार सापडत नाहीत, त्यांनी आम्हाला आवाहन देऊ नये असा टोलादेखील दळवींना लगावला.

हेही वाचा

सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report
Dharmendra Demise : रोमॅन्टिक हीरो ते बॉलिवूडचा सुपरस्टार..धर्मेंद्र! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
Embed widget