एक्स्प्लोर

बोलून-बोलून काय कराल, निधी देणार नाही, तो तसाही देत नाहीत; भास्कर जाधव अजित पवारांवर संतापले, राणेंनाही टोला

राज्याचा नियमित अर्थसंकल्प मार्च महिन्यात मांडला गेला, आणि पुन्हा 57 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मागितल्या गेल्या आहेत.

मुंबई : शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात थेट निधीचा मुद्दा उपस्थित करत अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यापूर्वी, शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी निधी वाटपात योग्य न्याय मिळत नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली होती. तर, भाजप (BJP) आमदारांनी देखील थेट गृहमंत्री अमित शाहांच्या कानावर हा विषय मांडला होता. त्यामुळे, अजित पवारांकडून केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांनाच निधी दिला जात असल्याचा आरोप महायुतीमधील आमदारांकडून होत असल्याचं यापूर्वीही पाहायाला मिळालं आहे. आता, भास्कर जाधव यांनी निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन अजित पवारांना (Ajit pawar) लक्ष्य करत, कोणाला किती पैसे द्यायचे हे अर्थमंत्री कसा ठरवू शकतो? असा सवाल उपस्थित केला आहे. 

राज्याचा नियमित अर्थसंकल्प मार्च महिन्यात मांडला गेला, आणि पुन्हा 57 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मागितल्या गेल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी 7 लाख 75 हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडला, मात्र अजूनही 2 अधिवेशन यंदाच्या वर्षात बाकी आहेत. अशात दोनदा पुरवणी मागण्या घेऊन येतील, तुटीचा अर्थसंकल्प मांडायला लागले आहेत. एकीकडे आम्हाला निधी मिळत नाही, अजित दादा अर्थमंत्री आहेत, मला त्यांचा आदर आहे. पण, मी संगमेश्वरला ते आले असताना गुहागर येथे छत्रपतींचा पुतळा उभरण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मागितला होता. मात्र, त्यांनी साधा होकार देखील दिला नाही. मला जेवणाचे निमंत्रण होतं. पण, असंख्य इंगळ्या डसल्या, कोण जेवणार तुमचं जेवण, असे म्हणत भास्कर जाधव यांनी अर्थमंत्री अजित पवारांना थेट लक्ष्य केलं. 

निधी देणार नाहीत, तो तसाही देत नाहीत

भाजपवाले अर्थ खात्याबद्दल तक्रारी करत आहेत, शिवसेनावाले तर आधीपासूनच तक्रारी करत होते, असा अर्थसंकल्प असत नसतो. राज्याच्या तिजोरीवर कर्ज होतंय, ज्याने कर्ज काढलेलं नाही त्याच्या डोक्यावर कर्ज आहे.  बोलून बोलून काय कराल, निधी देणार नाही, अरे तो तसाही तुम्ही देत नाहीत, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. कोणी एकाने चालवणारं हे खातं नाही. 7 लाख 75 हजार कोटींचा अर्थसंकल्प हा 8 लाख 15 हजारांवर घेत, 1 लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर केला गेला आहे. सध्या, जीएसटीवर तुमचं सर्व सुरु आहे, जीएसटी नसता तर काय होईल, असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला.  

एखादी आपत्ती आली, पाऊस पडला, तर पैसे कुठून आले? राखीव निधीसाठी सभागृहासमोर यावं लागलं. गृह विभागावर बोलत असताना मी कृषी विभागावरही बोलतो. बाब क्रमांक 3, आशिषजी तुमच्याकडे कृषी आहे ना? आपले कृषी मंत्री आहेत कुठे? वरच्या सभागृहात काय? चाक बिक पडतंय काय? म्हणून येत नाहीत?, असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला.

नितेश राणेंना टोला

लोकांना शिव्या देता, त्यातून मुख्यमंत्र्यांची शाबासकी मिळवता. त्याऐवजी ड्रेझरसाठी हट्ट करा आणि कोकणाला मदत करा. बाहेर जाऊन तुम्ही मला शिव्या द्याल, काही हरकत नाही. माझ्यासमोरच ही लहानाची मोठी झाली आहेत, आता काय ती मोठ्ठीच झालीत असा टोला भास्कर जाधव यांनी नितेश राणेंनाही लगावला आहे. नेपाळी लोकं आले होते, त्यातील एकानं स्थानिकाचा गळा कापला आणि पडत असलेल्या रक्ताने त्याने आंघोळ केली. खूप क्रूर होतं ते… मात्र त्यात त्यांना जामीन झाला, नितेश राणे तुम्ही याकडे जरा लक्ष द्या असा सल्ला देखील जाधव यांनी राणेंना दिला. 

पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्न

मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं मात्र साधं उत्तर देखील दिलं नाही, माझ्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, साधी विचारपूस देखील त्यांनी केली नाही. माझी गाडी सेनाभवनाबाहेर उभी, फूटपाथवर… गाडीची काच फोडली. मुंबईत टकटक गँग आहे, त्यांनी काचा फोडल्या आणि बॅगा घेऊन गेले, बॅगा भरलेल्या होत्या… अहो म्हणजे, कागदपत्रांनी भरलेल्या होत्या, असा टोलाही जाधव यांनी लगावला.  पोलिसांनी पथकं नेमली… इतके पथकं नेमतात… अक्षय शिंदेसाठी 10 पथकं, वाल्मिक मुंडेसाठी 50 पथकं. पोलिसांची पथकं नव्हे तर बँड पार्टी झाली आहे. बरं पथकं करतात काय… आरोपी पोलिस स्थानकात हजर होतो.. असे म्हणत पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही जाधवांनी हल्लाबोल केला. 

हेही वाचा

डबलच्या आमिषाला पुन्हा बळी पडले,शिर्डीत 21 जणांचे दीड कोटी लुटले; ग्रो-मोअरच्या बाप-लेकावर गुन्हा

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget