पिंपरी चिंचवड: महाराष्ट्र, मराठी अस्मिता आणि लोकशाही टिकवायची असेल तर संघर्षासाठी तयार रहा. यासाठी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी उभे रहा, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. ते सोमवारी पिंपरी चिंचवडमध्ये गजानन बाबर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमाला शरद पवार, श्रीनिवास पाटील आणि अमोल कोल्हेदेखील उपस्थित होते.


या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन बोलताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, पुरंदरच्या तहाचा इतिहास सांगितला गेला. युद्धात जिंकतो अन तहात हरतो, असं सांगितलं जातं. पण असं आता होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 किल्ले दिले ना? ठाकरेंनी 40 आणि पवार साहेबांनी 40  आमदार दिले. ज्याला ते किल्ले दिले त्या औरंगजेबला इथेच गाडलं गेलं. शाहिस्तेखानाची बोटे आणि अफजलखानाचा कोथळा महाराष्ट्रात काढला गेला. आता 40 अधिक 40 आणि काँग्रेसचा एक असे 81 आणि एकूण १८१ किल्ले आपण परत जिंकू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. 


तुतारीच्या आवाजने देवेंद्र फडणवीस बावरले: संजय राऊत


शरद पवार साहेब आत्ता सभागृहात जे सुरुये, ती विजयाची तुतारी आहे.  देवेंद्र फडणवीस काल साताऱ्यात गेले त्यावेळी छत्रपती उदयनराजेंच्या राजवाड्यात गेले. त्यावेळी पन्नास तुताऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं, हे पाहून फडणवीस गांगरून गेले. त्यांना काय करावं हेच कळेना. त्यामुळं तुतारी आणि मशाल हे चिन्ह मिळणं शुभसंकेत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.


अमोल कोल्हेंसाठी रसद


विलास लांडे म्हणाले त्यांचा एक कारखाना आहे, त्यात तीन हजार लोक काम करतात. हे वाक्य ऐकलं आणि माझ्या डोक्यावरचं ओझं हलकं झालं. कारण आता निवडणूक आली, खासदार कोल्हे काम चांगलं करतात मात्र त्यांच्याकडे पैसा नाही. त्यामुळं उद्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्यासाठी एक पाठीराखा पाहिजे, असा मी विचार करत होतो. आता विलासराव इतका जबरदस्त आणि शक्तिशाली पाठीराखा दुसरा कोणी नाही. तुम्ही तुमच्या कंपनीचा आणि तीन हजार कामगारांचा उल्लेख केल्यानं मला स्पष्ट झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले.


आणखी वाचा


संजय राऊत म्हणजे कोण? शहाजीबापू म्हणाले 5 लिटर रॉकेल आणि 2 काडीपेट्या घेऊन नारळाच्या झाडाखाली बसलेला माणूस