परभणी: इतिहासात फार जणांना संधी मिळत नाही, मोजक्या लोकांना संधी मिळते. सहा महिन्यांपूर्वी जरांगे पाटील कोण हे कोणालाही माहिती नव्हते. पण हा सामान्यातला सामान्य माणूस आज शरद पवारांचा (Sharad Pawar) बाप झालाय, असे वादग्रस्त विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. ते सोमवारी परभणीत ओबीसी भटके विमुक्त यांच्या एल्गार सभेत बोलत होते. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना इतिहासात नाव कोरण्याची संधी आहे. किंबहुना नवा इतिहास घडवण्याची संधी आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. 


परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर ओबीसी भटके विमुक्तांची एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. या एल्गार सभेला प्रकाश आंबेडकर, प्रकाश अण्णा शेंडगे, टी पी मुंडे यांच्यासह लक्ष्मण हाके आदी उपस्थित होते. या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे, शरद पवार, भाजप आणि थेट पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. मनोज जरांगे हे आज शरद पवारांचे बाप झाले आहेत. तसेच मराठा आरक्षणासाठी ओबीसी लढायला तयार आहे. परंतु स्वतंत्र मराठा आरक्षणासाठी आमच्या ताटातून नाही. तसेच घरातील प्रमुख माणूस म्हणून आपण तिरसट माणसाला करत नाही. त्यामुळे पंतप्रधानपदी तिरसट व्यक्ती कशामुळे निवडून देताय, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.


प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला


शिवरायांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना हाताशी धरुन स्वराज्य निर्माण केले. जरांगे पाटील यांना माझा सल्ला आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा ओबीसीही लढायला तयार आहे. पण ओबीसींची अट तुम्ही मान्य केली पाहिजे. त्यांची अट एवढीच आहे की, आमचं ताट आम्हाला राहू द्या. आपण वेगळं ताट काढू. त्यामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण देऊ. 


नरेंद्र मोदींसारख्या तिरसट व्यक्तीला पंतप्रधान करु नका: प्रकाश आंबेडकर


आपण उद्या चुकूनमाकून भाजपला मतदान करण्याचा विचार कराल. भाजपकडून काय प्रचार होईल? तर राहुल गांधी म्हणजे काय आहे, नरेंद्र मोदी मोठा आहे. पण तुमच्या कुटुंबातील तिरसट माणूस तुम्ही कुटुंबाचा प्रमुख करणार का, हे सांगा. मग देशाचा पंतप्रधान तिरसट कशाला करताय, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. 


आणखी वाचा


'ही धमकी समजायची का? उद्या जरांगे-पाटलांचा जीव गेला तर एकनाथ शिंदेंची जबाबदारी असणार का?'