Mahesh Gaikwad, Kalyan : शिवसेनेचे कल्याण प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यानंतर आज (दि.26) कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेतली. मात्र, महेश गायकवाड गोळीबाराचा थरार सांगतानाच मध्येच थांबले आणि पत्रकार परिषदेतून निघून गेले आहेत. सध्या त्यांच्यावर ताण येतोय नंतर पत्रकार परिषद घेतली जाईल, असे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. 


महेश गायकवाड म्हणाले, आमदार गणपत गायकवाडांनी शेतकऱ्यांना विरोध केला. गणपत गायकवाड शेतकऱ्यांचे पैसे खाणार होता. त्याचा मी विरोध केला. त्यानंतर मला दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले.  मी पोलीस स्टेशनला गेलो. त्याठिकाणी हे आमदार आले. आम्हाला त्यावेळी कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती. अगोदरच कटकारस्थान केलेल्या आमदाराने माझ्यावर गोळीबार केला. माझ्यावर हल्ला केला.


गोर गरीब शेतकऱ्यांसाठी मी गोळ्या खाल्ल्या 


पुढे बोलताना गायकवाड म्हणाले, आपल्या आशीर्वादाने मुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदे यांनी पाठिंबा दिला. श्रीकांत शिंदे हे मला भेटायला आले,तेव्हा मला शक्ती आली. आपल्यासाठी  जेव्हा नेता येतो तेव्हा बरे वाटते. तुमच्या आशीर्वादाने मी तुमच्या समोर आहे. गोर गरीब शेतकऱ्यांसाठी मी गोळ्या खाल्ल्या मला अभिमान आहे.


शेवटच्या श्वासपर्यंत मी तुमचे काम करेन


मला परत तुमची सेवा करायची संधी मिळाली. मी तुमची शेवटपर्यंत सेवा करेन. शेवटच्या श्वासपर्यंत मी तुमचे काम करेन. मला श्वास घेण्यास त्रास होतो मी तुमच्यासाठी इथूनच भेटतो.  आरोग्य आणि इतर बाबत मी तुमच्या पाठीशी आहे, असे श्रीकांत शिंदे मला म्हणाले. 


महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज 


भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले होते. त्यानंतर महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, आज दि. 26 चोवीस दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड यांच्यासह  पाच जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.सध्या सर्व आरोपींना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तळोजा कारागृहात (Jail) हलविण्यात आले आहे. 





इतर महत्वाच्या बातम्या 


Mahesh Gaikwad : मोठी बातमी! महेश गायकवाड यांना मिळाला डिस्चार्ज, स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी