'शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड संतापले, म्हणाले...
Jitendra Awhad on Devendra Fadnavis, मुंबई : "आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. पण, महाराजांनी सूरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता, किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं होतं."
Jitendra Awhad on Devendra Fadnavis, मुंबई : "आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. पण, महाराजांनी सूरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता, किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं होतं. पण, सूरत कधी लुटली नव्हती, जणू काही सर्वसामान्य लोकांची लूट करायला महाराज गेले अशा प्रकारचा इतिहास काँग्रेसने आम्हाला इतकी वर्ष शिकवला, त्याला माफी मागायला सांगणार आहात का?" असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. याबाबत आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची चॅलेंज दिलं आहे.
जितेंद्र आव्हाड काय काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेबांनी कहर केला. महाराजांनी सुरत लुटली नाही, सुरत लुटली नाही फक्त छावनी लुटली, असं फडणवीस साहेबांचा म्हणणं आहे. आज माझं आव्हान आहे, बर्नियर नावाचे इतिहासकार होते त्यांनी हे लिहून ठेवलय. त्याकाळी सुरत हे व्यापारचे ठिकाण होते. त्यांनी महाराजांच्या विरोधातल्या लढाईत सुरतमधून मदत गेली हा राग होता. हा आमचा अभिमान आहे. फडणवीस सांगतात हे सगळं काँग्रेसने केलय. इतिहासकरांना काँग्रेस पक्ष सांगायला गेला होता का? महाराज छावनी लुटायला गेलेले असं म्हणतात पण तसं नाही. महाराज स्वराज्य घडवायला जन्माला आले होते. तुम्ही महाराजांना लहान करताय. महाराजांचे शौर्य कमी करण्याचा प्रयत्न करतायत.
निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, पण महाराष्ट्र अस्वस्थ आहे
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, पण महाराष्ट्र अस्वस्थ आहे. त्यात मराठी माणसाला अतिशय दुःख झालं. मालवणला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. जगात अनेक पुतळे आहेत, अनेक वर्षा पूर्वीचा स्टॅचू ऑफ लिबर्टी, शाहू महाराज यांनी केलेला पुतळा गेट वे ऑफ इंडियाचा पुतळा आहे. कोणतेच पडले नाहीत. मालवणमध्ये आपटे यांनी पुतळा केला, पण एवढ्या लवकर पुतळा कसा असा झाला. ह्या ठिकाणी वादळ आलं असल्याच सांगितलं. त्यात नारळ आणि सुपारी सुद्धा पडत नाही. तुम्ही महाराजांकडे पहिलाच नाही. ज्याने क्लेचा पुतळा कधी बनवला नाही , तो आपटे महाराजांचा पुतळा बनवतोय. आपटे फरार आहे, हे फरार सरकार आहे. मध्यंतरी विशाल गडावर आक्रमण झाले. मशीद पाडली, त्यावर हल्ला केला. महाराजांनी सांगितलं कोणताही धर्म आणि जात असा भेदभाव करायचा नाही.
ह्याच ठिकाणी बदलापूर मधील घटना घडली. त्या ठिकाणी पोलीस केस घेत नव्हते. नंतर जनप्रक्षोभ झाला आणि केस घेतली. असं सरकार आहे कुठे चाललंय हा महाराष्ट्र ? आपटेला आणि शाळेला वाचवायचं आहे, त्यासाठी तिथे केस घेतली नाही. त्या ठिकाणी पोलिसांनी पोलिसांनी तक्रार घ्याला 13 तास लागेल केस घ्यायला. बदलापूरमध्ये शिवाजी महाराज यांचे चरण लागलाय. त्या ठिकाणी महाराज घोडे बदलायचे. त्या ठिकाणी असं सगळं घडतंय. त्यांच ठिकाणी आंदोलन करायला आलेल्या 300 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्या ठिकाणी वामन म्हात्रे यांनी केलेला विधानसभा चुकीचं आहे, असंही आव्हाड म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या