एक्स्प्लोर

Rajan Salvi : राजन साळवींच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा? व्यावसायिक भागीदाराला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा (ACB) म्हणजे लाचलुचपत विभागाचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा (ACB) म्हणजे लाचलुचपत विभागाचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. कारण साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायात पार्टनर असलेल्या व्यक्तीला आता एसीबीकडून नोटीस देण्यात आली आहे. दिनकर सावंत यांना 22 जानेवारी या तारखेला रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा नोटीसमध्ये उल्लेख केला आहे. रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर असलेल्या बांधकामाचा नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला असून संबंधित कागदपत्रे हे सोबत आणण्याचे ही या नोटिसमध्ये सांगितले आहे. तर मुलगा शुभम साळवी याने दिलेल्या जबाबानंतर आता व्यावसायिक पार्टनर असलेल्या व्यक्तीची ही चौकशी होणार असल्याचे सांगितले जातंय. 

दिनकर सावंत यांना 22 जानेवारी एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

ठाकरे गटाचे कोकणातील आमदार राजन साळवी यांच्यावर अवैध मालमत्ता प्रकरणाचा ठपका ठेवत या पूर्वी एसीबीने दिलेल्या तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच या प्रकरणी त्यांची आणि साळवी कुटुंबियांची एसीबीकडून चौकशी देखील झाली होती. अशातच साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायात पार्टनर असलेल्या व्यक्तीला आता एसीबीकडून नोटीस देण्यात आली आहे. त्यानुसार, दिनकर सावंत यांना 22 जानेवारी या तारखेला रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा नोटीसमध्ये उल्लेख केला आहे.

एसीबीकडून आलेल्या नोटीसचा नेमका तपशील काय? 

या प्रकरणी एसीबीकडून आलेल्या नोटीसा मध्ये उल्लेख करण्यात आला आहे की,  राजन प्रभाकर साळवी, त्यांची पत्नी अनुजा राजन साळवी तसेच मुलगा शुभम राजन साळवी यांच्या विरुध्द दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २४/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ (संशोधन २०१८) चे कलम १३(१) (ब) सह १३ (२) व कलम १२ प्रमाणे अपसंपदेचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत.

14वा वित्त आयोग योजने अंतर्गत रत्नागिरी जिल्हयातील दांडेआडम येथे डंपिंग ग्राउंड करीता कंपाउंड वॉलचे बांधकाम करणे, तसेच रस्ता विकसित करणे हे काम आपण व "साळवी कस्ट्रक्शन" यांनी मिळून केले असल्याचे शुभम राजन साळवी यांनी सांगितलेले आहे.  त्या अनुषंगाने आपणाकडे तपास करायचा असलेने आपण दिनांक २२/०१/२०२५ रोजी ११.०० वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्त्नागिरी कार्यालयामध्ये वरील कामासबंधीत सर्व कागदपत्र, आपला ठेकेदार परवाना, करारपत्र, कामाची निविदा कागदपत्र, कामाची वर्क ऑर्डर "साळवी कस्ट्रक्शन" या फर्मला कामाची रक्कम ज्या बँक खात्याव्दारे पाठविली त्या बँक खात्याचे खाते उतारे, तसेच सदर कालावधीतील आपली आयकर विवरणपत्र घेवुन उपस्थित रहावे. असे या नोटीस मध्ये उल्लेख करण्यात आला आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Khadse : जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
KKR vs RCB : पहिल्याच सामन्यात दारुण पराभव का झाला? अजिंक्य रहाणे टीम कुठं चुकली ते सांगत म्हणाला... आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत....
केकेआरच्या हातातून मॅच कधी निसटली, अजिंक्य रहाणेनं टर्निंग पॉईंट सांगितला, म्हणाला....
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News 23 March 2025ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsSushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण समोर, सीबीआयच्य अंतिम अहवालात काय?100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha 23 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Khadse : जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
KKR vs RCB : पहिल्याच सामन्यात दारुण पराभव का झाला? अजिंक्य रहाणे टीम कुठं चुकली ते सांगत म्हणाला... आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत....
केकेआरच्या हातातून मॅच कधी निसटली, अजिंक्य रहाणेनं टर्निंग पॉईंट सांगितला, म्हणाला....
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
29 की 30 मार्च? गुढीपाडवा नेमका कधी?
29 की 30 मार्च? गुढीपाडवा नेमका कधी?
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
Embed widget