मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur Case) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Death) याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. एका शिंदेचा एन्काऊंटर झालाय, दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल, असे त्यांनी म्हटले होते. आता शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 


राऊतांनी उबाठा गटाचा एन्काऊंटर केलाय


संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या डोक्यावर झालेल्या परिणामच हे लक्षण आहे. इतका महामूर्ख माणूस राजकारणामध्ये बोलू शकतो हे उबाठा गटातच होऊ शकते. जेल भोगून आल्यावर बेलवर असलेला माणूसच असे बेताल वक्तव्य करू शकतो. संजय राऊत यांनी जो उबाठा (Shiv Sena UBT) गटाचा एन्काऊंटर केलाय आणि त्याची सुपारी शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली होती. तुम्ही तुमचं काम कर जनता ठरवेल कोणाचा एन्काऊंटर करायचा, अशी टीका त्यांनी संजय राऊतांवर केली आहे.  


नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत? 


राज्यात आणि देशात असे अनेक एन्काऊंटर आम्ही पाहिले आहे. मला जितकी अंडरवर्ल्डची माहिती आहे तेवढं गृहमंत्री आणि एन्काऊंटर करणाऱ्यांना देखील माहिती नाही. संस्थाचालक दोषी नसतील तर त्यांच्यावर पोस्कोअंतर्गत का गुन्हा दाखल केला आरोपीने आपल्या जबावात काही खुलासे केले होते म्हणून त्याचं एन्काऊंटर झालं. कुणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर केला. एका शिंदेचा एन्काऊंटर झालाय. दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या तोंडावर बुरखा अन् हातही बांधलेले, मग त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला; संजय राऊतांच्या पोस्टने सस्पेन्स वाढला


गोळ्या घालून खूपच सहज मरण दिलं, तुडवून मारायला पाहिजे होतं; अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया