सातारा : अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवरून (Akshay Shinde Encounter)  विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरलंय. शाळा प्रशासन, पोलीस आणि सरकार या तीन घटकांवर विरोधी पक्षाने निशाणा साधलाय. शाळा प्रशासनाला पाठिशी घालण्यासाठी एन्काऊंटर घडवून आणला असा गंभीर आरोप करण्यात येतोय. तर दुसरीकडे  साताऱ्याचे खासदार  उदयनराजे भोसले यांनी याबाबत आपली बेधडक भूमिका मांडली आहे.  अशा  गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांच्यात सोडून तुडवून मारले पाहिजे, असे  खासदार उदयनराजे म्हणाले. 


खासदार उदयनराजे म्हणाले, सत्ताधारी विरोधक मला काही घेणदेणे नाही. सत्ताधारी असू दे किंवा विरोधक जे कोणी असू दे यांच्या कुटुंबासोबत हा प्रसंग घडला असता तर काय केले असते? बोलले असते का? अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्या कुटुंबाच्या जागेवर मी स्वत:ला ठेवून मी बोलत असतो. गोळ्या घालून मारणे हे अतिशय सहज झाले. अशा लोकांना जनतेत सोडले पाहिजे. जनतेने त्यांना तुडवून मारले पाहिजे.


सरळ लोकांसमोर त्याला फाशी द्या : उदयनराजे


मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की, त्या काळात  जी न्यायव्यवस्था होती त्या प्रकारची न्यायव्यवस्था झाली पाहिजेत. त्यासाठी कायद्यात बदल करा. बलात्कर  केला की सरळ लोकांसमोर त्याला फाशी द्या, असे उदयनराजे म्हणाले. 


अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सीआयडीला पत्र 


बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी ठाणे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांनी एनएचआरसी, न्यायदंडाधिकारी, एसीएस होम आणि सीआयडी यांना पत्र लिहून या घटनेची माहिती दिली आहे. राज्य सीआयडी या प्रकरणाची चौकशी करेल आणि न्यायदंडाधिकारी चौकशीही केली जाईल.


सुषमा अंधारेंनी  उपस्थित केले पाच सवाल


अक्षय शिंदेने शाळा प्रशासनावर काही गंभीर खुलासे केले होते, ते उजेडात येऊ नये यासाठी एन्काऊंटर करण्यात आलं असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय, तर या सर्व प्रकरणावर सुषमा अंधारेंनी पाच सवाल उपस्थित केलेत. अक्षय शिंदेने पिस्तूलचं लॉक कसं काढलं? अक्षय शिंदेला तळोजामधून बदलापूरला न्यायचं होतं मग गाडी मुंब्राकडे का नेली? यामध्ये कुणाला वाचवलं जातंय याची चौकशी व्हावी, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी सवाल केला आहे. 


हे ही वाचा :


अक्षय शिंदेच्या बॉडीचा एक्स-रे काढणार, जे.जे. रुग्णालयातील तीन डॉक्टरांचं पॅनल पोस्टमार्टेम करणार