मुंबई :  बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur Case) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Death) याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या ट्विटने या प्रकरणाचा सस्पेन्स वाढवला आहे. 


संजय राऊत यांनी एक्स या समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात दिसून येत आहे की, अक्षय शिंदेला पोलीस घेऊन जात आहेत. त्यावेळी त्याचे हात बांधलेले असून तोंडावर बुरखा घालण्यात आलेला आहे. यावरून संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे. 


महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे : संजय राऊत


संजय राऊत यांनी म्हटले आहे की, याने पोलिसांवर हल्ला केला? अक्षय शिंदे याला पोलीस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता. त्यामुळे नक्की काय घडले? कुणाला वाचविण्यासाठी शिंदे, फडणवीस हा बनाव करत आहेत? महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 






नेमकं काय घडलं? 


बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलीस त्याला ठाण्याकडे आणत होते. अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात मोरे गंभीररीत्या जखमी झाले. अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून अक्षय शिंदेच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या. त्यात अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला. यानंतर अक्षय शिंदेला कळवा महापालिका रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. 


आणखी वाचा 


अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर होण्याआधी तळोजा कारागृहात काय काय घडलं?, वडिलांनी सर्व सांगितलं!