Shilpa Bodkhe : उद्धव ठाकरेंवर पत्रातून टीका, आता शिल्पा बोडखेंचा शिंदे गटात प्रवेश
Shilpa Bodkhe, Mumbai : ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या शिल्पा बोडखे ( Shilpa Bodkhe) यांनी सोमवारी (दि.26) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
Shilpa Bodkhe, Mumbai : ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या शिल्पा बोडखे ( Shilpa Bodkhe) यांनी सोमवारी (दि.26) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रा. बोडखे (Shilpa Bodkhe) यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या महिला नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यादेखील उपस्थित होत्या.
ठाकरे गटात वारंवार अपमान गळचेपी आणि मानसिक खच्चीकरण बोडखेंचा आरोप
विदर्भात शिवसेना वाढवण्याचे सर्वसामान्य पोहचवण्याचे काम आजवर प्रा. शिल्पा बोडखे आपल्या पूर्ण क्षमतेने प्रामाणिकपणे करत होते. मात्र, ठाकरे गटात वारंवार अपमान गळचेपी आणि मानसिक खच्चीकरण झाल्याचा आरोप बोडखे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. शिवाय त्यानंतर त्यांनी उबाठा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करत त्यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली.
उबाठा गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या प्रा.शिल्पा बोडखे यांनी आज वर्षा या निवासस्थानी येऊन हाती भगवा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 26, 2024
विदर्भात #शिवसेना… pic.twitter.com/sSAdB0fgVH
मुख्यमंत्री शिंदेंकडून पक्षात स्वागत
मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करताना प्रा. बोडखे यांनी यापुढेही त्याच प्रामाणिकपणे पक्षाचे काम करावे आणि राज्य सरकारचे काम आणि पक्षाचे विचार विदर्भातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिल्पा बोडखेंनी कोणते आरोप केले होते?
ठाकरे गटात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आणि शिवसेना नेते आदित् ठाकरे यांच्या शब्दाला किंमत आहे. पण आता मला कळाले की, येथे विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांच्याकडे पक्षाचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. त्या उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला देखील जुमानत नाहीत, असा आरोप शिल्पा बोडखेंनी केला होता.
मी पक्षाचे अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या शिवसेना भवनात बसून षडयंत्र रचत बसल्या. मला सोशल मीडियाचे काम करायचे नाही असं पत्र मी आदित्य ठाकरे यांना पाठवले. मात्र, विशाखा राऊत यांना मी काम करून नये आणि त्रस्त होऊन राजीनामा द्यावा असं वाटत आहे, असं शिल्पा बोडखे यांनी म्हटले होते.
इतर महत्वाच्या बातम्या