एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil: सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये , मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल; भाजपच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Maratha Reservation: मराठा बांधवांच्या विनंतीनुसार, मी आमरण उपोषण स्थगित करत आहे. त्याचे रुपांतर साखळी उपोषणात करत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. राज्य सरकारकडून जवळपास १०४१ गुन्हे दाखल

मुंबई: मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर एकेरी आणि खालच्या भाषेत टीका केल्यानंतर आतापर्यंत सबुरीचे धोरण बाळगत असलेले राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. यापूर्वी पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु, सोमवारी पहिल्यांदाच पोलिसांकडून थेट मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

कालपासून राज्य सरकारकडून जवळपास १०४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी ४२५ गुन्हे मराठवाड्यात दाखल करण्यात आले आहेत. तर बीड जिल्ह्यातील शिरुर आणि अमळनेरमध्ये मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रास्ता रोकोसाठी लोकांना प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे समजते.

भाजप आमदारांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत भाजप आमदारांची बैठक पार पडली. यावेळी भाजप आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. आपण मराठा समाजाच्या पाठिशी आहोत, ही बाब आपापल्या मतदारसंघात जाऊन सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा. मनोज जरांगे पाटील वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय भाषा बोलत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा संयमाने हाताळला पाहिजे.  भाजप मराठा समाजाच्या पाठिशी राहणार आहे. यापूर्वीही भाजप सरकारनेच मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले. आतादेखील नव्याने दिलेले आरक्षण कोर्टात टिकेल, हा विश्वास लोकांना द्या, अशी सूचना भाजप आमदारांना करण्यात आली आहे.  तसेच या बैठकीत भाजप आमदारांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली. मनोज जरांगे राजकीय भाषा बोलत असतील तर त्यांना प्रत्युत्तर द्या, असेही भाजप आमदारांना सांगण्यात आले आहे.

मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित

मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी दुपारी आमरण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. त्याचे रुपांतर साखळी उपोषणात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनोज जरांगे आता पुढील एक-दोन दिवस उपचार घेऊन मराठा बांधवांच्या भेटीसाठी गावागावात फिरणार आहेत. यावेळी मनोज जरांगे यांच्या दौऱ्यांना मराठा बांधवांचा पूर्वीप्रमाणेच प्रतिसाद मिळणार का, हे आता पाहावे लागेल. राज्य सरकारकडून मराठा आंदोलन चिघळू नये, यादृष्टीने खबरदारीची पावले उचलली आहेत. त्यासाठी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.

आणखी वाचा

मनोज जरांगे पाटील सागर बंगल्याच्या दिशेने रवाना होताच फडणवीस साताऱ्यातून तातडीने मुंबईकडे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा

व्हिडीओ

Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Embed widget