एक्स्प्लोर

मोठी बातमी : परळी, कागल ते आंबेगाव, शरद पवारांनी 20 जागा हेरल्या, दादांच्या आमदारांविरुद्ध तरुण उमेदवार देणार!

विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून 20 युवकांना संधी देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांविरोधात शरद पवारांनी दंड थोपटले आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेलाही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. त्या दृष्टीने दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षाने तीन युवा उमेदवारांच्या नावाची घोषणाही यापूर्वी केली आहे. राष्ट्रवादीकडून यापूर्वी तासगाव विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघासाठी रोहित पाटील तर, अहमदनगरच्या अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. त्यानंतर, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 20 मतदारसंघात तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये, अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीतील दिग्गजांविरुद्ध नवे चेहरे मैदानात असणार आहेत. त्यात, अजित पवारांच्या पक्षातील मंत्र्यांविरुद्ध शरद पवारांनी दंड थोपटल्याचं दिसून येत आहे.   

विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून 20 युवकांना संधी देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांविरोधात शरद पवारांनी दंड थोपटले असून प्रमुख 20 विधानसभा मतदारसंघात तरुणांन मैदानात उतरवण्यात येणार असल्याचे समजते. त्यामध्ये, धनंजय मुंडेंचच्या परळी, हसन मुश्रीप यांच्या कागल, दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तर, आदिती तटकरेंच्या श्रीवर्धन मतदारसंघातूनही नवयुवकांना संधी देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्यातील 20 मतदारसंघात चाचपणी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तासगाव आणि अकोले मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने यापूर्वीच युवा उमेदवारांच्या नावाची घोषणाही केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर 40 पेक्षा जास्त आमदारांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत महायुतीत सहभाग घेतला. मात्र, शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या हिंमतीने अजित पवारांविरुद्ध लढा दिला. लोकसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ 1 खासदार निवडून आला. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तब्बल 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला. त्यामध्ये, बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे, आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवयुवकांना संधी देऊन विधानसभेत पाठविण्याची पवारांची रणनीती आहे.  

युवकांसाठी हे मतदारसंघ असण्याची शक्यता 

1) अहेरी 
सध्या आमदार धर्मारावबाबा आत्राम 

2) आष्टी
सध्या आमदार बाळासाहेब आसबे 

3) दिंडोरी  
सध्या आमदार नरहरी झिरवळ

4) गेवराई 
सध्या भाजपचा आमदार आहे 

5) श्रीवर्धन
सध्या आमदार अदिती तटकरे आहे.

6) हडपसर 
सध्या आमदार चेतन तुपे आहे.

7) पुसद 
सध्या आमदार इंद्रनील नाईक आहे.

8) बारामती 
सध्या आमदार अजित पवार आहे.

9) अळमनेर 
सध्या आमदार अनिल पाटील आहे.

10) उदगीर (अ.जा.)
सध्या आमदार संजय बनसोडे आहे.

11) इंदापूर 
सध्या आमदार दत्तात्रय भरणे आहे.

12) अणुशक्ती नगर 
सध्या आमदार नवाब मलिक आहे.

13) परळी 
सध्या आमदार धनजंय मुंडे आहे.

14) कागल 
सध्या आमदार हसन मुश्रीफ आहे.

15) आंबेगाव 
सध्या आमदार दिलीप वळसे पाटील आहे.

16) मावळ 
सथ्या आमदार सुनील शेळके आहे.

17) सिन्नर 
सध्या आमदार माणिकराव कोकाटे आहे.

18) तुमसर 
सध्या आमदार राजू कोरमोरे आहे.

19) फलटण (अ.जा)
सध्या आमदार दीपक चव्हाण आहे.

20) वडगाव शेरी 
सध्या आमदार सुनील टिंगरे आहे.

हेही वाचा

Video : भाजप आरेला कारे करेल; उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर फडणवीसांचे दोन शिलेदार उतरले मैदानात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
Embed widget