एक्स्प्लोर

मला जी काँग्रेस समजते ती संपणार नाही, असा पक्ष संपत नसतो, पुन्हा उभारी घेईल : शरद पवार

Sharad Pawar : शरद पवार यांनी बिहार निवडणुकीत आणि महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी महिलांना वाटण्यात आलेल्या पैशांचा निकालावर परिणाम होत असल्यास त्यावर विरोधी पक्षांनी विचार करण्याची गरज आहे,असं म्हटलं.

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. सोलापूरचे माजी महापौर अ‍ॅड. यू. एन. बेरिया ह्यांचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कामगार चळवळ आणि सहकार क्षेत्रातील योगदानाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सोलापूरमध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यानंतर शरद पवार यांनी  येथे ‘दुभंगलेला समाज, बिहार निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक, बेरोजगारी आणि काँग्रेस हा न संपणारा पक्ष आणि विचार’ या मुद्यांवर पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी काँग्रेस हा न संपणारा पक्ष आहे.   

Sharad Pawar on Congress : काँग्रेस संपणार नाही : शरद पवार

शरद पवार यांनी सोलापूर हे सामाजिक प्रश्नावर एका व्यापक विचारानं पुढे जाणारं शहर आहे, असं म्हटलं. अलीकडे काही शक्ती जातीधर्मामध्ये जाणीवपूर्वक अंतर निर्माण करून देशाच्या ऐक्यावर आघात करत आहेत, पण सोलापूर सामाजिक एकवाक्यता आणि एकता ह्यात तडजोड करत नाही, असंही त्यांनी म्हटलं. 

बिहार विधानसभा निकालाबाबत आमची माहिती वेगळी होती आणि निकाल वेगळा लागला. मात्र, लागलेला निकाल स्वीकारायचा असतो. निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसारखी योजना महाराष्ट्र असो किंवा बिहार त्या ठिकाणी सरसकट महिलांना पैसे देण्यात आले. नगरपालिका निवडणुकीत पैसे वाटप होतात हे आम्ही ऐकले होते पण सरकारच्या माध्यमातून सबंध महिला वर्गाला 10 हजार देणे हे आम्ही कधी ऐकले नव्हते. याचे काही परिणाम होतात की नाही हे लोकांनी ठरवावे. दहा हजार दिले तेच सत्ताधाऱ्यांच्या विजयाचं कारण असेल तर आम्हाला बसून विचार करावा लागेल,असंही शरद पवार म्हणाले.

मतदारांना प्रभावित करण्यासाठी निवडणुकांआधी 10 हजार रु. थेट खात्यात देणं हेच सत्ताधाऱ्यांच्या यशाचं सूत्र असेल तर आम्हा विरोधी पक्षांना त्या तंत्राबद्दल चर्चा करावी लागेल. येत्या संसदीय अधिवेशनादरम्यान दिल्लीत सर्व विरोधी पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसणार आहोत आणि काहीतरी ठोस धोरण ठरवावं असा विचार माझ्या मनात आहे,असं शरद पवार यांनी सांगितलं.

भाजप सोडून सर्वांसोबत युती आघाडी शक्य

स्थानिक पातळी आम्ही महापालिका निवडणुकांमध्ये लक्ष घालतो पण नगरपालिका, नगर पंचायतीत आम्ही स्थानिक नेतृत्वांना निर्णयाचे अधिकार देत असतो. त्यानुसार स्थानिक राजकीय-सामाजिक परिस्थिती पाहून काही पक्ष एकत्र येत असतात पण ते एकत्र येताना भाजपाला सोडून काही पक्ष एकत्र येत असतील तर ते योग्यच आहे, असं शरद पवार म्हणाले. 

ते पत्र म्हणजे बेरोजगारीचा दुष्परिणाम

लग्न होत नाही म्हणून मला एका तरुणाचं पत्र आलं होतं त्याबद्दल माध्यमांमध्ये खमंग चर्चा झाली पण एक गोष्ट खरी आहे की, अनेक ठिकाणी बेरोजगारी आहे आणि त्या बेरोजगारीचा दुष्परिणाम तरुण पिढीच्या आयुष्यावरही होतोय,असं शरद पवार म्हणाले.

काँग्रेस संपणार नाही

महाराष्ट्राचा विचार केला तर 1957 मध्ये काँग्रेसचा पराभव झालेला. संयुक्त महाराष्ट्र समितीचा विजय झाला होता.त्यावेळी काँग्रेस संपली असं म्हटलं गेलं पण पक्ष असे संपत नसतात. चढ उतार असतो, पुन्हा एकदा उभारी घेईल. मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस कधीही संपणारी नाही. गांधी-नेहरू ह्यांचा विचार स्वीकारलेली ही काँग्रेस देशात पुन्हा एकदा वेगळ्या स्थितीला पोहोचल्याचं आपण पाहू, असं शरद पवार म्हणाले.  

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
BJP : विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, तर स्मृती इराणींना अखेर मोठी जबाबदारी; भाजपची नवी टीम
विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, तर स्मृती इराणींना अखेर मोठी जबाबदारी; भाजपची नवी टीम
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget