एक्स्प्लोर

अजित पवारांच्या काटेवाडीतून शरद पवारांचा इशारा; मोदींना म्हणाले, बारामतीचा चमत्कार बघितला ना

शरद पवार यांनी नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकांवर भाष्य करताना काटेवाडीकर नेहमीच माझ्या पाठिशी राहिल्याचं म्हटलं. ही निवडणूक साधी सोपी नव्हती,

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांचे बारामती दौरे वाढले असून आगामी विधानसभा निवडणुकांसाठीही त्यांनी रणशिंग फुंकल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी बारामतीमधील (Baramati) व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात उपस्थिती दर्शवत बारामतीच्या विकासासाठी वेळ पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घ्यायला मागेपुढे पाहणार नसल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, वडगाव निंबाळकर गाव दौऱ्यातून येथील जनता गेल्या 57 वर्षांपासून माझ्या पाठिशी असल्याचं त्यांनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीत येथील जनता आपल्या पाठिशी राहिली. गेल्या 57 वर्षांपासून आपण सर्वजण माझ्या पाठिशी आहात, असेही पवार यांनी म्हटले. तसेच, नाव न घेता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दमदाटीवरुनही टोला लगावला होता. आता, शरद पवारांचं जन्मगाव असलेल्या काटेवाडीतून त्यांनी थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. 

शरद पवार यांनी नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकांवर भाष्य करताना काटेवाडीकर नेहमीच माझ्या पाठिशी राहिल्याचं म्हटलं. ही निवडणूक साधी सोपी नव्हती, यापूर्वी मी निवडणुकीला जास्त येत नव्हतो. एक-दोनवेळा मी यायचो आणि निवडणूक तुमच्या हाती देऊन मी महाराष्ट्रभर फिरायचो. मात्र, यंदाच्या निवडणुकीत अधिक लक्ष द्यावं लागलं. पण, येथील लोकं माझ्या पाठिशी आहेत, याची मला खात्री होती, असे म्हणत येथील शालेय शिक्षणपासूनची सुरुवातही पवारांनी सांगितली. 

आजचा दिवस माझ्या लक्षात राहणारा दिवस आहे, कारण माझं चौथी पर्यतचं शिक्षण इथे झालं आहे, आम्हाला वाघमारे नावाचे मास्टर होते. शनिवार आणि रविवारी सुट्टीचा दिवस होता तेव्हा, आमची आई गुरे घेऊन पाठवायची, अशी बालपणीची आठवण शरद पवारांनी सांगितली. सत्तेचा वापर लोकांच्या आयुष्यात चांगला बदल करायचा असतो ही शिकवण मला यशवंतराव चव्हाण यांनी दिली, त्याच वाटेने मी जात आहे. आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये मला यश आलं. कारण, नारळ इथे फोडला होता, असे म्हणत काटेवाडीकरांची मने जिंकली. 

शरद पवारांचा मोदींवर निशाणा

कन्हेरीत नारळ फोडल्यावर यश मिळते हा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे, देशात कुठंही गेलो तरी लोकं विचारायचे बारामतीत काय होईल?. माझं मन मला सांगायचं की बारामतीकर माझी साथ सोडणार नाहीत ते खरं झालं. जिथं लोकं सांगत होते मतं पडणार नाहीत, त्या बुथवर चांगली मते पडली. मोदी इथे आले आणि एकच विषय होता शरद पवार. देशाचा पंतप्रधान माझं नाव घेतो काय साधी सुधी गोष्ट आहे का? काटेवाडीकरांचा चमत्कार त्यांना कळालं, असे म्हणत शरद पवारांनी मोदींवर हल्लाबोल केला. तसेच, मोदींनी टीका केली की मतं आपल्याकडे येतात. मोदींनी अजून इथं याव, असेही पवार यांनी म्हटलं. 

त्यांचे फलक, आपले यश

काही ठिकाणी पैशाचे वाटप झाले असे म्हणतात खरे-खोटं माहीत नाही. पण, मागच्या गोष्टी काढायच्या नाहीत, काम करीत राहायचं. देशात लोकशाही आहे, पण इथे हुकूमशाही आणायचा प्रयत्न होता. पण, तुम्हा लोकांमुळे लोकशाही टिकली. मला कुणीतरी सांगितले की गावागावात फलक दिसत आहेत. त्यांना मी म्हणालो त्यांचे फलक आपले यश, निवडून कोण आले हे महत्त्वाचे.आपण बाकी गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायचं नाही.

कारखान्यावरुन अजित पवारांना टोला

आप्पासाहेब कारखाना चांगला चालवत होते. कारखाना आता चांगला चालत नाही. कोण मार्गदर्शन करते हे बघावे लागले. आता कारखानदारी नीट करावी लागेल. कारण, तुमच्या संसाराचा विषय आहे, असे म्हणत शरद पवारांनी थेट अजित पवारांना लक्ष्य केले. एक हजार रुपये शेतकऱ्यांना कमी मिळतात. तो कारखाना आता ताब्यात घ्यायचा, छत्रपती एक नंबरचा कारखाना शेवट नंबरला गेला. त्याची दुरुस्ती करायची आहे, त्यासाठी तुमची गरज आहे. मी सगळीकडे जातो तिकडे नेते असतात आताची परिस्थिती वेगळी आहे नेते दिसत नाहीत. मलिदा गँग बाजूला झाली असे हे म्हणतात. आपल्याला बदल करायचा आहे, जिथं मलिदा गँग असेल त्याला त्यांची जागा दाखवू. आपल्याला चित्र बदलायचं आहे, महाराष्ट्रामध्ये बदल करायचा, राज्यात सत्ता आणू आणि लोकांच्यात चांगला बदल करू, असेही पवार यांनी म्हटले. पवार यांनी नाव न घेता अजित पवारांना काटेवाडीतून लक्ष्य केलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीलाPorsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Ladki Bahin Yojana : महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
Embed widget