Sharad Pawar on Pune Accident : विशाल अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवारांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले
Sharad Pawar on Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात बिल्डरच्या लेकाने रॅश ड्राईव्हिंग (Pune Accident) करत दोन तरुणांचा जीव घेतलाय. त्यानंतर पुण्यातील हे हिट अँड रन प्रकरण चांगलच तापलंय.
Sharad Pawar on Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात बिल्डरच्या लेकाने रॅश ड्राईव्हिंग (Pune Accident) करत दोन तरुणांचा जीव घेतलाय. त्यानंतर पुण्यातील हे हिट अँड रन प्रकरण चांगलच तापलंय. बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या लेकाचा जामीन रद्द करत त्याची 14 दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, अपघात झाला त्यावेळी अल्पवयीन आरोपीसमवेत त्याचे दोन मित्र होते, त्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. देशभरात पुणे अपघात प्रकरणाचे पडसाद उमटले मात्र, पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलेले नाही. यावर पत्रकारांनी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांना काही सवाल केले. दरम्यान विशाल अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध आहेत, असा आरोप होत आहे, असा सवाल विचारताच शरद पवारांच्या (Sharad Pawar) चेहऱ्यावरिल भावच बदलेले आहेत.
पत्रकारांनी काय विचारले ? शरद पवार काय म्हणाले?
पुण्यात एक हिट अँड रनचे प्रकरण घडलय. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार याबाबत कुठेही भाष्य करताना दिसत नाहीत. शिवाय, आरोपीच्या वकिलांशी तुमचे संबंध असल्याचे आरोप केले जात आहेत. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, हा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा. आता तुम्ही एखाद्या वकिलांचा संबंध तुम्ही याच्याशी जोडणार आहात. कोणीतरी चार ओळी छापल्या हा काही राष्ट्रीय प्रश्न आहे, असं मला वाटतं नाही. प्रत्येक ठिकाणी मीच भाष्य केलं पाहिजे, याची काही आवश्यकता नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याबाबतची जबाबदारी पाळली आहे. आता या प्रकरणाला वेगळं स्वरुप देण्याची गरज नाही.
पंतप्रधानांचे वक्तव्य चिंता व्यक्त करावी अशी आहेत
शरद पवार म्हणाले, गेल्या काही महिन्यांतील पंतप्रधानांचे वक्तव्य चिंता व्यक्त करावी अशी आहेत. देशाचे पंतप्रधान या स्तरावर जाऊन बोलतात. आपण यापूर्वी असं कधी पाहिलेलं नाही. मला त्यांच्या गेल्या 8 ते 10 दिवसांतील अनेक गोष्टी काढता येतील. पण मला आज त्या विषयावर बोलायचे नाही. डोंबवली भागात कारखानदारी बरिच आहे. ती एकदम हलवण्याची मागणी करणे ही कितपत व्यवहार्य आहे? हे तपासलं पाहिजे. आज एकदम सांगता येणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या